बुलडाणा - कोरोना परिस्थितीत महिला परिचारिका धुरा सांभाळत आहेत. पण 15 वर्षांपासून नर्सिंगमध्ये ज्योती चौधरी या बुलडण्याच्या आरोग्य विभागात काम करत आहेत. सध्या ज्योती चौधरी आपल्या अनुभवाने जिल्हा कोविड सेंटर असलेल्या स्री रूग्णालयात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आजचा (12 मे) दिवस जगभरात 'परिचारिका दिवस' म्हणून साजरा केला जातो. कोरोना काळात परिचारिका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 72 हजारांच्या वर गेला आहे. तर 67 हजार 227 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्हा कोविड सेंटर स्री रूग्णालयात 183 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर अतिदक्षता विभागातील 26 रूग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर आहेत. या महामारीच्या काळात सर्वच अत्यावश्यक सेवांचा कस लागतो आहे. मात्र मुख्यत: कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्यांमध्ये परिचारिका महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. यात बुलडाण्याच्या जिल्हा स्त्री कोविड सेंटरमधील मनिषा चौधरी यांचीही महत्त्वाची भूमिक आहे. त्या 15 वर्षांपासून नर्सिंग क्षेत्रात काम करत आहेत. रुग्ण भरती करण्यापासून रूग्णाला डिस्चार्ज देण्यापर्यंत त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. ते जे काम करतात ते जगासमोर येत नाही. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमध्ये परिचारिका रूग्णसेवा करीत आहेत. त्यात रुग्णाला सलाईन, इंजेक्शन लावण्यापासून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावणे, व्हेंटिलेटरमधील जाळी बदलने, पाणी बदलने, ऑक्सिजनमधील पाणी तपासणे इत्यादी कामे केली जातात. जर ऑक्सिजनमधिल पाणी संपले तर अनुचित घटना घडून रुग्ण दगावू शकतो. म्हणून ऑक्सिजन मेंटेन ठेवणे गरजेचे असते. अन्यथा साईड इफेक्ट होऊ शकतात. ही सर्व कामे ज्योती चौधरी करतात. त्यांच्या या कार्याला आज जागतिक परिचारिका दिनी सलाम केला जात आहे.
हेही वाचा - माऊली मातोश्री फाउंडेशनकडून मदतीचा हात; गरजूंना मोफत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा पुरवठा
हेही वाचा - रिक्षात बसून दारू पिणाऱ्याला पोलिसांनी दिला चोप; व्हिडिओ जोरदार व्हायरल