भंडारा - पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोणा प्रकार काही केल्या संपुष्टात येत नाही. केवळ मनात संशयाने घर केल्याने भंडारा येथील एका महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. जादूटोणा करत आपल्या पत्नीला मारल्याचे कारण समोर करत एका आरोपीने मित्राच्या मदतीने बबिता तिरपुडे या (45 वर्ष) महिलेची डोक्यावर काठिने वार करत गळा दाबुन हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलिस स्टेशन अंतर्गत नवेगांव येथे उघड झाली आहे. राजहंस कुंभरे (40 वर्ष), विनोद रामटेके (40 वर्ष, दोन्ही रा. नवेगाव (कोका) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
28 तारखेला झाली होती हत्या - कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथील बबिता तिरपुडे ही 28 तारखेला तलावावर कपडे धुण्यासाठी गेली असता बऱ्याच कालावधी नंतर ही ती परत न आल्याने कुटुंबांनी तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला होता. डोक्यावर काठी मारून व गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते.
आरोपीच्या पत्नीचा मृत्यूला महिला कारणीभूत - याप्रकरणी कारधा पोलिसांच्या तासात गावातील दोन संशयित लोकांना ताब्यात घेतले. या पैकी मुख्य आरोपी राजहंस कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पत्नीचा काहीच महिन्या अगोदर मृत्यू झाला होता. त्याच्या पत्नीवर बबिता हिने जादू टोणा केला असल्यानेच तिचा मृत्यू झाला असल्याचा संशय आरोपी राजहंस याला होता. याचा राग त्याच्या मनात असल्याने त्याने बबिता हिची हत्या करण्याची योजना बनविली. यासाठी त्याने गावातील विनोद याची मदत घेत घटनेच्या दिवशी बबिता जेव्हा तलावातून कपडे धुवून घरी जात होती तेव्हा मागवून तिच्या डोक्यावर काठीने वार केला आणि नंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करून करून घटना स्थळावरून पसार झाले. आरोपीने गुन्ह्याची काबूली दिल्यानंतर दोन आरोपीला काराधा पोलिसनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात यांनी सांगितले.
भंडाऱ्यात जादुदोणाच्या संशयावरून महिलेची हत्या - भंडाऱ्यात जादुदोणाच्या संशयावरून महिलेची हत्या
कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथील बबिता तिरपुडे ही 28 तारखेला तलावावर कपडे धुण्यासाठी गेली असता बऱ्याच कालावधी नंतर ही ती परत न आल्याने कुटुंबांनी तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळला होता. डोक्यावर काठी मारून व गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते.