ETV Bharat / state

Naxalite Milind Teltumbde's Journey : मिलिंद तेलतुंबडेच्या हत्येचा बदला घेणार, नक्षलवाद्यांचा पत्रकातून इशारा

भाकपाचे (माओवादी) केंद्रीय प्रवक्ता अभय याने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात मिलिंद तेलतुंबडेसह अन्य नक्षल्यांनी नक्षल चळवळीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मर्दिनटोला जंगलातील घटनेच्या निषेधार्थ २७ नोव्हेंबरला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगाणा व आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शिवाय २७ नक्षल्यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकीही अभयने दिली आहे. (Abhay Communist Party of India Maoist)

milind teltumbde
मिलिंद तेलतुंबडे
author img

By

Published : Nov 19, 2021, 9:28 PM IST

Updated : Nov 19, 2021, 9:42 PM IST

गडचिरोली - कोरची तालुका-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील मर्दिनटोला जंगलात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. (Milind teltumbde's dies in encounter) मात्र, या घटनेच्या निषेधार्थ माओवादी कम्युनिस्ट पक्षाने २७ नोव्हेंबरला सहा राज्यांमध्ये बंदचे आवाहन केले आहे. (Maharashtra band appealed)

will take milind teltumbde's encounter revenge cip (maoist) given warning
नक्षलवाद्यांचा पत्रकातून इशारा

बदला घेण्याची धमकी -

भाकपाचे (माओवादी) केंद्रीय प्रवक्ता अभय याने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात मिलिंद तेलतुंबडेसह अन्य नक्षल्यांनी नक्षल चळवळीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मर्दिनटोला जंगलातील घटनेच्या निषेधार्थ २७ नोव्हेंबरला महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगाणा व आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शिवाय २७ नक्षल्यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकीही अभयने दिली आहे. (Abhay Communist Party of India Maoist)

२ डिसेंबरपासून पीएलजीए सप्ताह -

नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबर या कालावधीत पीपल्स गुर्रिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी अनेक हिंसक कारवाया करतात. त्यामुळे २७ नोव्हेंबरच्या बंदनंतर पीएलजीए सप्ताहात ते हिंसाचार घडवू शकतात. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

हेही वाचा - Naxalite Milind Teltumbde's Journey : नक्षलवादी मिलींद तेलतुंबडेचे चंद्रपूर कनेक्शन; नक्षलवादाची सुरुवात 'अशी'...

मिलिंद तेलतुंबडे आहे तरी कोण?

मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील राजूर येथील रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे हा सह्याद्री, दीपक इत्यादी टोपणनावांनी नक्षल चळवळीत ओळखला जात होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला मिलिंद तेलतुंबडे हा मागील 30 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. प्रतिबंधित माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिवही होता. त्याच्यावर राज्य पोलिसांनी 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

तीन राज्याचा प्रमुख -

तीन-चार वर्षांपूवी महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) झोन स्थापन करण्यात मिलिंदने महत्वाची भूमिका पार पाडली. या झोनचा तो सर्वोच्च नेता होता. चालू आठवड्यात राज्याचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात सुरजागड खाणी विरोधातील आंदोलनासंदर्भात टीका करणारे एक पत्र जारी झाले होते. त्यावर नक्षल्यांच्या दक्षिण झोनचा प्रवक्ता श्रीनिवास याची स्वाक्षरी होती. मात्र, पत्रातील भाषेवरुन ते पत्र सह्याद्री यानेच लिहिल्याचे स्पष्ट झाले होते.

3 वर्षातील सर्वात मोठी कारवाई -

शनिवारी पोलिसांनी 26 नक्षल्यांना ठार केले. मागील तीन वर्षातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. 22 एप्रिल 2018 ला भामरागड तालुक्यातील कसनासूर व दामरंचा परिसरात झालेल्या चकमकीत तब्बल 40 नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्यात साईनाथ, शिनू हे मोठे नक्षल कॅडर ठार झाले होते. त्यानंतर यंदा 21 मे रोजी एटापल्ली तालुक्यातील पयडी जंगलात पोलिसांनी 13 नक्षल्यांचा खात्मा केला होता. शनिवारच्या चकमकीतही नक्षवाद्यांचा मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे याच्यासह आणखी काही मोठे नेते ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही मोठी कारवाई ठरली आहे.

Last Updated : Nov 19, 2021, 9:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.