भंडारा - मागील 24 तासांपासून पडणाऱ्या निरंतर पावसामुळे तसेच गोंदिया मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारा जिल्ह्याला या महिन्यात दुसऱ्यांना पुराचा सामना करावा लागला आहे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या पावसामुळे जवळपास 44 गावांचा संपर्क तुटला आहे Wainganga river तसेच यावर्षी पहिल्यांदाच गोसे धरणाचे दार हे 3 मीटरने उघडण्यात आले असून यामधून 15940 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे दरम्यान नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिला आहे
वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत होत आहे झपाट्याने वाढ भंडारा शहराला लागत असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे 245 ही धोक्याची पातळी असून सध्या पैनगंगा नदीची पाणीपातळी 246.90 मीटर इतकी आहे मागील 24 तासापासून भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यात आणि मध्यप्रदेशच्या सीमा वरती भागात पाऊस सतत सुरू असल्याने वैनगंगा नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे
धरणाचे दार 3 मीटर ने उघडले यावर्षी पहिल्यांदाच गोसे धरणाचे दार हे तीन मीटरने उघडण्यात आलेले आहे आठ दिवसा पहिले पूर्व परिस्थिती निर्माण झाल्यावर कोसी धरणाचे दार हे अडीच मीटर पर्यंत उघडण्यात आले होते गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे 13 दार मध्यप्रदेश चे संजय सरोवर चे 4 भंडारा जिल्ह्यातील बावनथडी धरणाचे 6 आणि धापेवडा धरणाचे 23 दारे उउघडण्यात आल्याने हा सर्व पाणी वैनगंगा नदीत आल्याने भंडारा जिल्ह्यात पूर पूरपरिस्थिती निर्माण झाली ही पूर परिस्थिती अजून वाढू नये यावर नियंत्रण मिळविता यावे यासाठी गोसे धरणाचे 33 ही दार उघडण्यात आले असून 11 गेट 3 मीटर ने तर 22 गेट अडीच मीटर ने उघडण्यात आले असून या मधून 15940.43 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे
44 गावचा तुटला संपर्क गत दोन दिवसापासून भंडारा जिल्ह्यात व लाखांदूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीला ओवर फ्लो झाली असून आलेला पुराच्या पाण्याने परिसरातील सर्व नाले व ओढे तुडुंब भरले आहे तालुक्यातील मांढळ गावाजबळ चुलबंद नदी पुलावरून पुराचे पाणी वाहत असून मांढळ ते दांडेगाव मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे दांडेगाव मार्गावरील नाल्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन नाला काठावरील शेत शिवारात पुराचे पाणी शिरून शेत पिके पाण्याखाली बुडाली आहेत निरंतर सुरू असलेल्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे तुमसर भंडारा मोहाडी पवनी साकोली लाखनी आणि लाखांदूर या सातही तालुक्यातील जवळपास 44 गावांचा संपर्क तुटलेला आहे. ज्या नदी नाल्यावरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढविलेला आहे पाऊस असा सुरू राहिला आणि वरच्या भागावरून येणाऱ्या पावसाचा जोर असाच राहिला तर 2020 प्रमाणे भंडारा जिल्हाला पुराचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक अलर्ट मोड वर आहे
हेहील वाचा - Independence Day स्वातंत्र्यदिनी रॅली काढत दावते इस्लामिक हिंद संघटनेचा १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प