ETV Bharat / state

वैनगंगा नदीत अज्ञात व्यक्तीची आत्महत्या; ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान - भंडारा बातम्या

वैनगंगेच्या पुलावरून अज्ञात व्यक्तीने सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असून व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Mar 18, 2020, 3:15 PM IST

भंडारा - पवनी तालुक्यातील वैनगंगेच्या पुलावरून अज्ञात व्यक्तीने सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

वैनगंगा नदीत अज्ञात व्यक्तीची आत्महत्या

नेहमी वर्दळीच्या असलेल्या वैनगंगा पुलावर एक व्यक्ती ये-जा करत होता. पण, त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. नेहमीप्रमाणे एखादा प्रवासी असावा असे नागरिकांना वाटत होते. मात्र, त्याने अचानक पुलावरून उडी घेतली. तो उडी घेत असताना काही लोकांनी त्याला बघितले. त्यांनी वाचविण्यासाठी मदतही मागितली, पोलिसांना बोलाविण्यात आले, ढिवर समाजाच्या लोकांनी पाण्यात उतरून त्याचा शोध घेतला आणि काही वेळानंतर त्याला शोधण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - CORONA : कोरोनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ग्रा. पं. सदस्यासह तिघांवर गुन्हा दाखल

या व्यक्तीच्या उजव्या हातावर "अर्जुन" असे गोंदन असून अंगात काळी पॅन्ट व टी शर्ट घातलेला आहे. टी शर्टच्या डावीकडे इंग्रजी एच असे लाल अक्षरात प्रिंट आहे. सदर व्यक्ती अंदाजे 50 वर्ष वयाचा असून अशा वर्णनाची कोणी व्यक्ती गायब असेल तर पवनी पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.