ETV Bharat / state

रस्ते आणि नालीच्या कामावरून प्रभाग 8 मधील दोन नगरसेवकांचे भांडण चव्हाट्यावर - भंडारा नगरसेवकांचे भांडण चव्हाट्यावर

नाली आणि रस्त्याच्या बांधकामात कमिशन मिळाले नसल्याने भांडण केल्याचा आरोप एका नगरसेवकाने केला तर भंडारा नगरपालिकेमध्ये सर्वच काम करणारा एकमेव ठेकेदार हा निकृष्ट दर्जाचे काम करतो, त्यामुळे दर्जेदार काम व्हावे यासाठी हे काम थांबवले असल्याचे दुसऱ्या नगरसेवकाने सांगितले आहे. या नगरसेवकांची हे भांडण आता शहरात चर्चेचा विषय झालेला आहे.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Feb 4, 2021, 10:17 PM IST

भंडारा - नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 8 च्या नगरसेवकांचे भांडण चव्हाट्यावर आले आहे. नाली आणि रस्त्याच्या बांधकामात कमिशन मिळाले नसल्याने भांडण केल्याचा आरोप एका नगरसेवकाने केला तर भंडारा नगरपालिकेमध्ये सर्वच काम करणारा एकमेव ठेकेदार हा निकृष्ट दर्जाचे काम करतो, त्यामुळे दर्जेदार काम व्हावे यासाठी हे काम थांबवले असल्याचे दुसऱ्या नगरसेवकाने सांगितले आहे. या नगरसेवकांची हे भांडण आता शहरात चर्चेचा विषय झालेला आहे.

भंडारा

काम बंद करताना दोन गटात झाले भांडण
भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील म्हाडा कॉलनीमध्ये विशेष रस्ते निधीअंतर्गत नाली आणि रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी आणि त्या प्रभागातील नगरसेवक उमेश ठाकरे हे प्रभागात पोहोचले. त्याच दरम्यान याच प्रभागातील आणि याच भागात राहणाऱ्या महिला काँग्रेस अध्यक्षा व नगरसेविका जयश्री बोरकर आणि त्यांचे पती हे घटनास्थळी पोहोचले. हे काम सुरू करण्याअगोदर रस्त्यापासून मोजणी करून नंतरच नालीचे बांधकाम करा तसेच ह्या कंत्राटदाराची जुने काम पूर्ण केल्यानंतर या कामाला सुरुवात करा, असे म्हणून काम थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे सुरुवातीला नगरसेवक उमेश ठाकरे आणि नगरसेविकेचे पती रवी बोरकर यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांशी रवी बोरकर आणि त्यांचा भाऊ धर्मेंद्र बोरकर यांच्याशी भांडण झाले.
भांडणाचे व्हिडिओ झाले व्हायरल
नगरसेवक उमेश ठाकरे आणि नगरसेविकेचे पती रवी बोरकर यांच्यात शाब्दिक भांडण झाले. यामध्ये त्यांनी एकमेकांची लायकी काढली आणि त्यानंतर कामगारांसोबत झालेल्या भांडणाचे व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
कमिशन न मिळाल्यामुळे काम थांबवण्याचा उमेश ठाकरे यांचा आरोप
एक कोटी 63 लाखाचे नाली आणि रस्त्याचे काम तिरोडा येथील आर्या कंपनी तर्फे केले जाणार आहे. या कामातील पाच टक्क्यांची मागणी जयश्री बोरकर चे पती रवी बोरकर यांनी केली आणि हे पाच टक्के न मिळाल्याने त्यांनी हा काम थांबविण्याचा आरोप नगरसेवक उमेश ठाकरे यांनी केलेला आहे. रवी बोरकर हे पोलिस विभागात कर्मचारी असूनही शासकीय कामात कोणत्या अधिकाराने अडथळे निर्माण करत आहेत. त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांच्या विरुद्ध मी पोलिसात तक्रार करणार असल्याचे उमेश ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
हा कंत्राटदार निकृष्ट काम करतो आणि काम अर्धवट सोडतो
भंडारा नगरपालिकेतील जवळपास 90 टक्के काम तिरोडा येथील बच्छानी हे कंत्राटदाराला करतात आणि हा कंत्राटदार त्याच्या मर्जीनुसार वागतो. बरेच काम त्यांनी अर्धवट करून ठेवलेले आहेत. तसेच कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असतो. त्यामुळे माझ्या परिसरात होणारे काम दर्जेदार व्हावे यासाठी सर्व नियम पाळले जावे, तसेच त्याचे जुने काम पूर्ण करून नंतरच हे काम सुरू करावे, या मागणीसाठी हे काम बंद केले आहे. मी एक महिला नगरसेविका आहे, त्यामुळे काम थांबविताना कोणी मला इजा पोहचवू नये, म्हणून माझ्या मदतीला माझे पती आलेत, असे नगरसेविकेने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.