ETV Bharat / state

टोमॅटोवर करपा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल - tomato in maharashtra

तुमसर तालुक्यातील सोरणा, लोहारा, लंजेरा या गावातील शेतकरी धान (भात) पीक निघाल्यानंतर भाजीपाल्याची लागवड करीत असतात. या गावातील शेतकऱ्यांनी सध्या टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. तोडणीला आलेल्या टोमॅटो पिकातून हातात नगदी पैसे येईल, या विचाराने शेतकरी आनंदी होता. मात्र, अचानक टोमॅटोची झाडे वाळू लागली. टोमॅटो गळून खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी हे पीक वाचविण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली. या फवारण्यांचा फायदा तर झालाच नाही, उलट खर्चच जास्त झाला.

tomato
टमाटरवर करपा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
author img

By

Published : Jan 21, 2020, 11:32 PM IST

Updated : Jan 21, 2020, 11:53 PM IST

भंडारा - तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकावर करपा आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. धान शेतीपाठोपाठ भाजीपाला उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टोमॅटोवर करपा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

हेही वाचा - मुंबई मेट्रोच्या अश्विनी भिडेंची अखेर उचलबांगडी; त्यांच्याजागी रणजीतसिंग देओल यांची नियुक्ती

अशा परिस्थितीत सरकारकडून त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. तुमसर तालुक्यातील सोरणा, लोहारा, लंजेरा या गावातील शेतकरी धान (भात) पीक निघाल्यानंतर भाजीपाल्याची लागवड करीत असतात. या गावातील शेतकऱ्यांनी सध्या टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. तोडणीला आलेल्या टोमॅटो पिकातून हातात नगदी पैसे येईल, या विचाराने शेतकरी आनंदी होता. मात्र, अचानक टोमॅटोची झाडे वाळू लागली. टोमॅटो गळून खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी हे पीक वाचविण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली. या फवारण्यांचा फायदा तर झालाच नाही, उलट खर्चच जास्त झाला.

हेही वाचा - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करून साजरा केला लग्न सोहळा

या क्षेत्रातील जवळपास शेकडो एकर क्षेत्रातील पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी खासगी कर्ज घेऊन या पिकांची लागवड केली होती. आता हे पीक खराब झाल्याने कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा भर पडली असून शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे.

हेही वाचा - महाबीजच्या अहवालाने विद्यापीठांच्या बीज संशोधनावर प्रश्नचिन्ह ; शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर प्रकार उघडकीस

कृषी विभागाने पिकांची केली पाहणी

कृषी विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी टोमॅटो पिकाची पाहणी केली. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांचे नुकसान होऊन त्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे यावेळी दिसून आले. यासंदर्भात पंचनामे करून सरकारला तसा अहवाल पाठवण्यात येईल, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

Intro:Anchor :- तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अवकाळी आलेल्या पाऊसामुळे टमाटर च्या पिकाला करपा आणि बुरशीजन्य रोग लागल्याने हाताशी तोंडाशी आलेल्या टमाटरचा पीक पूर्णतः नष्ट झाला असून शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. अवकाळी पावसाने धान शेतीचेही नुकसान झाले होते आता भाजीपाला शेतीचा नुकसान झालं असल्याने सरकार त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हे शेतकरी करीत आहेत. Body:तुमसर तालुक्यातील सोरणा, लोहारा, लंजेरा, या गावातील शेतकरी धान पीक निघाल्यानंतर भाजीपाला पिकाची लागवड करीत असतात. या गावातील शेतकऱ्यांनी सध्या शेतात टमाटर पिकाची लागवड केली आहे. टमाटर आता तोडणीला आले होते या विक्रीतून हातात नगदी पैसे येणार या आनंदात शेतकरी असतांना अचानक टमाटरची झाडे वाळू लागली तर झाडाला लागलेली टमाटर गळून खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी हे पीक वाचविण्यासाठी वेगवेगळ्या औषधींची फवारणीची केली मात्र या औषधींचा तीळ मात्र फायदा झाला नाही उलट पीक वाचविण्यासाठी औषधींवर खर्च झाला.
या क्षेत्रातील जवळपास शेकडो एकर क्षेत्रातील पीक पूणतः नष्ठ झाले आहेत, शेतकऱ्यांनी खाजगी कर्ज घेऊन या पिकांची लागवड केली होती. आता हे पीक खराब झाल्याने कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा भर पडली असून सरकारनी शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांचे पीक खराब झाल्याने याची माहिती कृषी विभागाला दिली
कृषी विभागाची टीम आपल्या तज्ञ अधिकाऱ्यांची चम्मु घेऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली असता 20 दिवस अगोदर झालेल्या अवकाळी पाऊसामुळे तसेच कधी ढगाळ तर कधी उन्ह या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाला असून या टमाटर पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगामुळे त् शेतकऱ्यांचे सर्व पीक खराब झाले आहे. या संबंधित पंचनामे करण्यात येथील व सरकारला तसा अहवाल पाठविण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल असे अधिकारी यांनी सांगितले आहे,

आधीच धान्य पीक हे पाऊसात भिजून खराब झाले असतांना आता भाजीपाला पिकांनाही या अवकाळी पाऊसाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांना जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला असून आतातरी मायबाप सरकारनी शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहे.

BYTE :- अमृत उंचीबघेले , शेतकरी
BYTE :- राधेश्याम शरणागत , शेतकरी
BYTE :- सूचित लाकडे, कृषी तज्ञ अधिकारी, भंडाराConclusion:
Last Updated : Jan 21, 2020, 11:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.