ETV Bharat / state

तिबेटची भाषा, धर्म आणि संस्कृती ही भारताचे देणे - निर्वासित राष्ट्रपती पेंपा त्सेरिंग

बौद्ध धर्म आणि तिबेटची संस्कृती हे ही भारताची देण आहे. त्यामुळे आमचे भारताशी भाषिक सांस्कृतिक आणि धार्मिक नाते आहे. चीनशी मात्र आमचे वैचारिक, धार्मिक, सांस्कृतीक कोणतेही संबंध नाहीत. मात्र तिबेटवर कब्जा करून चीन आता चीनी संस्कृती रुजवण्यासाठी तिबेटमध्ये प्राथमिक शिक्षणापासून चिनी भाषा शिकवण्याची सक्ती करत असल्याचेही पेंपा त्सेरिंग यांनी सांगितले.

Tibetan Refugee Leader Penpa Tsering
निर्वासित राष्ट्रपती पेंपा त्सेरिंग
author img

By

Published : Apr 15, 2022, 6:33 PM IST

भंडारा - तिबेटची भाषा, तिबेटीयन धर्म आणि तिबेटियन संस्कृती ही भारताची देण आहे. चीन आपल्या विध्वंसक नीतीने तिबेटची संस्कृती नष्ट करत असल्याचा आरोप निर्वासित राष्ट्रपती पेंपा त्सेरिंग यांनी केला. ते गुरुवारी रात्री भंडाऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारताने तिबेटला सतत मदत केली आहे. मात्र चीनवर अजून दबाव नीतीचा अवलंब केल्यास तिबेटच्या संस्कृतीचे नक्कीच रक्षण करता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमचे नाते भारताशी आहे चीनशी नाही

तिबेटमध्ये बोलली जाणारी भाषा ही भारतापासून घेतलेली आहे. एवढेच नाही तर बौद्ध धर्म आणि तिबेटची संस्कृती हे ही भारताची देण आहे. त्यामुळे आमचे भारताशी भाषिक सांस्कृतिक आणि धार्मिक नाते आहे. चीनशी मात्र आमचे वैचारिक, धार्मिक, सांस्कृतीक कोणतेही संबंध नाहीत. मात्र तिबेटवर कब्जा करून चीन आता चीनी संस्कृती रुजवण्यासाठी तिबेटमध्ये प्राथमिक शिक्षणापासून चिनी भाषा शिकवण्याची सक्ती करत आहे. त्यामुळे तिबेटची खरी संस्कृती कालांतराने लोप पावेल आणि तिबेटचे अस्तित्व धोक्यात येईल. ही संस्कृती वाचवण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. यासाठी भारत आणि अमेरिकेची मदत मिळाल्यास आम्हाला आमची संस्कृती वाचवण्यात यश येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निवड झालेले 6 वर्षीय लामा यांना केले गायब

चीनने धर्मगुरू लामा नियुक्त करण्याची तिबेटची परंपराही खंडित केली आहे. तिबेटियन संस्कृती जपणारा धर्मगुरू लामा बदलवून आपली चीनी संस्कृती थोपवनारा लामा आमच्यावर थोपल्याचे पेंपा यांनी सांगितले आहे. या शिवाय परंपरागत रित्या येत असलेला लामा या धर्मगुरूंना चिनने गायब केल्याची धक्कादायक माहितीही पेंपा यांनी दिली आहे.

तिबेटवर चीनने लादले कठोर निर्बंध

चीनने आवागमचे नियम कठोर केल्याने दोन वर्षात केवळ पंधरा लोक तिबेटियन देशातून भारतात आले. आता तिबेटची आजची खरी माहिती मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. तिबेटियन संस्कृती भारतातून आली असल्याने तिचे जतन करण्यासाठी भारताने तिबेटला सहकार्य करावे अशी मागणीही पेंपा त्सेरिंग यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.