ETV Bharat / state

Lightning Strike : वीज कोसळून तिघांचा मृत्यू, 25 जण जखमी - वीज कोसळून तिघांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. वत्सला बावनथडे (वय 50) लता वाढवे (वय 50) रा. नवेझरी, तालुका. तिरोडा, दामा भीमटे, रा. कांद्रि, तालुका मोहाडी यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

25 people injured due to lightning strike
विज कोसळून 25 जण जखमी
author img

By

Published : Jul 21, 2023, 9:31 PM IST

वीज कोसळून 25 जण जखमी

भंडारा : जिल्ह्यात आज विविध ठिकाणी वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर शेतात काम करणाऱ्या २५ शेतकरी महिला जखमी झाल्या आहेत. तसेच 5 शेळ्यांचा मृत्यू देखील वीज कोसळल्याने झाला आहे. मृतकांमध्ये वत्सला बावनथडे (वय 50) लता वाढवे (वय 50) रा. नवेझरी, तालुका. तिरोडा, दामा भीमटे, रा. कांद्रि, तालुका मोहाडी यांचा समावेश आहे. तर सर्व पंचवीस जखमींवर भंडारा, तुमसर, अड्याळ येथे उपचार सुरू आहेत.

महिलांच्या अंगावर वीज कोसळली : आज 21 दुपारी अडीच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील निलज येथे शेतात जेवणासाठी बसलेल्या पाच महिलांच्या अंगावर वीज कोसळली. यात वत्सला बावनथडे, लता वाढवे यांचा मृत्यू झाला. दोन्ही महिला 50 वर्षाच्या होत्या. सुलोचना सिंगनगुडे (५५), बेबीताई सय्याम (५५) निर्मला खोब्रागडे (५०) या तीन महिलांना भंडारा जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या सर्व महिला तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथील होत्या.

25 महिला शेतकरी बेशुद्ध : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनने जोर पकडला आहे. भंडारा जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अधूनमधून पाऊस पडत आहे. अशातच भंडारा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील चिचाळ गावातील महिला शेतात मशागत करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शेत परिसरात वीज पडल्याने 25 महिला शेतकरी जागीच बेशुद्ध झाल्या. शेतमालकाने घटनेची माहिती देताच सर्व महिलांना तातडीने अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये छाया बिलवणे, कविता मोहनकर, अनिल काटेखाये, रूपचंद बिलवणे, बाळकृष्ण बिलवणे, ज्ञानेश्वर बिलवणे, विजय मोहनकर, प्रमिला काटेखाये, दीपमाला बिलवणे, रुखमा बिलवणे, संगीता नखाते, चारू भुरे, गीता बिलवने, रुजू मोहरकर, सुषमा बिलवणे, सुनीता मोहरकर, सुनीता बिलवणे, ज्योत्स्ना मोहरकर, प्रियंका बिलवने, राणी कातेखाये, विक्की बिलवने, श्रीकृष्ण काटेखाये यांचा समावेश आहे.

पाच शेळ्यांचा मृत्यू : तसेच तुमसर तालुक्यातील रणेरा येथे वीज पडल्याने चार शेळ्यांचा मृत्यू झाला आहे, तर साकोली तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या घरामागे वीज पडल्याने एका शेळीचा मृत्यू झालेला आहे. आज भंडारा जिल्ह्यात वीज पडून तिघांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र शेतीची कामे करतांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून विजेपासून एखाद्याचा जीव वाचवता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - Ishalwadi Landslide Update : इर्शाळवाडीत बचावकार्य सुरुच; आणखी पाच मृतदेह आढळले, आकडा 21 वर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.