ETV Bharat / state

उन्हाळ्यात बसने प्रवास करताय, सावधान ! चोरांच्या टोळीसाठी गर्दी ठरतेय सुवर्णसंधी

author img

By

Published : May 9, 2019, 5:28 PM IST

वाढत्या गर्दीमुळे भंडाऱ्यातील बस स्थानकात चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे.

बसमध्ये चढताना प्रवासी

भंडारा - बस स्थानकावर एका महिलेच्या पर्समधून ५१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. बस स्थानकावर एकाच महिन्यातील चोरीची ही तिसरी घटना आहे. उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांच्या गर्दीमुळे बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी चोरांसाठी सर्वात सोपे सावज ठरत आहेत.

बस स्थानकावरील प्रवासी

उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराई यामुळे एप्रिल ते जून या ३ महिन्यात बसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. नेमक्या याच गर्दीचा फायदा घेत चोर लोकांच्या पाकीटवर, त्यांच्या दागिन्यांवर हात साफ करताना दिसून येत आहे.

प्रवास करताना प्रवासी बसमध्ये सीट मिळवण्याच्या प्रयत्नात एकमेकांना खेटून उभे राहतात. त्यावेळी आपले पाकीट, दागिणे, मोबाईल व्यवस्थित आहे की नाही याचेही त्यांना भान नसते. प्रवाशांच्या याच निष्काळजीचा फायदा घेत मोठ्या हात चलाखीने ही चोरांची टोळी लोकांच्या बॅगेमधील पैसे, दागिने, पाकीट आणि मोबाईल चोरी करतात. चोरी करताना प्रवाशांना काहीही कळत नाही. मात्र, जेव्हा त्यांच्या लक्ष्यात येत तेव्हा त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असते.

तुमसरच्या गांधी नगरातील मंगला एकनाथ उरकुडे या एका लग्नसोहळ्यांसाठी एसटी बसने भंडाऱ्याला पोहोचल्या. बसस्थानकावर आल्या नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या बॅगमधील सोन्याची ३१ ग्रॅमची चपलाकंठी, १२ ग्रॅमचे गोप, काळ्या मण्याची गळासोरी आणि ८ ग्रॅम सोन्याचे मनी तसेच पदक असे एकूण ५१ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. या सोन्याची किंमत १ लाख ३० हजार रुपये आहे. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच भंडारा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मात्र, प्रवाशांनी उन्हाळ्यात अशा घटना थांबवण्यासाठी बस स्थानकावर पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

Intro:ANC : भंडारा बस स्थानकावर एका महिलेच्या पर्स मधून 51 ग्राम सोन्याचे दागिने चोरीला गेले, बस स्थानकावर एकाच महिन्यातील चोरीची ही तिसरी घटना आहे. उन्हाळच्या दिवसात प्रवश्याच्या गर्दी मुळे बस मध्ये प्रवास करणारे प्रवाशी चोरांसाठी सर्वात सोपे सावक ठरतात,

Body:उन्हाळच्या सुट्ट्या, लग्नसराई यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यात बस मध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची संख्येत मोठया प्रमाणात वाढ होते. नेमक्या याच गर्दीचा फायदा घेत चोर लोकांच्या पैश्यांच्या पाकीटवर, त्यांच्या दागिन्यांवर हात साफ करतात.

तुम्हीच बघा बस येताच सीट मिळविण्याच्या प्रयत्नात लोक कसे एकमेकांना खेटून उभे राहतात त्यावेळेस आपले पाकीट, दागिणे, मोबाईल व्यवस्थित आहे की नाही याचाही त्यांना भान नसतो, प्रवाशांच्या याच निष्काळजीचा फायदा घेत मोठ्या हात चालकीने ही चोरांची टोळी लोकांच्या बॅग मधील पैसे , दागिने, पाकीट, मोबाईल चोरी करतात आणि प्रवाश्यांना कळत नाही जेव्हा लक्ष्यात येत तेव्हा बसायला सीट तर मिळते मात्र मोठ्या आर्थिक नुकसान झालेला असतो.

तुमसरच्या गांधी नगरातील मंगला एकनाथ उरकुडे या एका लग्नसोहळ्यांसाठी एसटी बसने भंडाऱ्याला पोहचले. बसस्थानकावर आल्या नंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या बँगमधील सोन्याची 31 ग्रॅम ची चपलाकंठी, 12 ग्रॅम चे गोप, काळ्या मण्याची गळासोरी, सोन्याचे मनी व पदक 8 ग्रॅम असे ऐकून 51 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास झाल्यास लक्षात आले. या सोन्याची किंमत 1 लाख 30 हजार रुपये आहे. दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच भंडारा पोलीस स्टेशन ला तक्रार दिली, पोलीस तपास करीत असून उन्हाळ्यात अश्या घटना थांबविण्यासाठी बस स्थानकावर पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.