ETV Bharat / state

भंडारामध्ये ताज मेहंदी बाबांची ३ दिवसीय यात्रा - बीड बातमी

ताज मेहंदी बाबा यांचा जन्मदिवस आज 14 जानेवारीला होता. या दिवसापासूनच दरवर्षी बीड येथे ही यात्रा भरविली जाते. 1994 मध्ये बीड गावात या बाबा ताज मेहंदी यांच्या दरबाराची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी येथे तीन दिवसीय यात्रा भरते.

taj-baba-mehndi-yatra-three-days-in-beed
taj-baba-mehndi-yatra-three-days-in-beed
author img

By

Published : Jan 14, 2020, 9:30 PM IST

Updated : Jan 14, 2020, 9:57 PM IST

भंडारा - मोहाडी तालुक्यातील बीड (सितेपार) गावात ताज मेहंदी बाबा यांच्या दरबारात मकर संक्रांतीनिमित्त तीन दिवसीय यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी यात्रेमध्ये विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.

भंडारामध्ये ताज मेहंदी बाबांची ३ दिवसीय यात्रा

हेही वाचा- बोगस 'रॉ' अधिकाऱ्याचा पर्दाफाश; पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात झाला होता दाखल

ताज मेहंदी बाबा यांचा जन्मदिवस आज 14 जानेवारीला होता. या दिवसापासूनच दरवर्षी बीड येथे ही यात्रा भरविली जाते. 1994 मध्ये बीड गावात या ताज मेहंदी बाबा यांच्या दरबाराची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी येथे ३ दिवशीय यात्रा भरते. ताज मेहंदी बाबा यांच्या दरबारात भरणारी ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक आहे. कारण ताज मेहंदी हे मुस्लीम असले तरी त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूंची संख्या सर्वात जास्त आहे. एवढेच नाही तर संस्थांची सर्व कमिटी हिंदू सांभाळतात. लोकांना होणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक अडचणी सोडविण्यासाठी येथे लोक येतात. मात्र, सर्वात जास्त लोक हे दारू सोडविण्यासाठी येथे येतात. बाबाच्या चरणी येणाऱ्याची दारू सुटते, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच प्रत्येक संक्रातीच्या काळात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातून लोक मोठ्या संख्येने येथे येतात.

दारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, येथे आल्यावर दारू सुटते, असा समज असल्याने तीन दिवसांच्या मुक्कामाला संपूर्ण कुटुंबासह लोक येतात. याठिकाणी तीन दिवस मोठी जत्रा भरते. भजन किर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो. भूत, बाधा आणि दुर्धर आजारापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. तसेच याठिकाणी दारू सुटते, असा दावाही लोक करतात.

Intro:anc :- मोहाडी तालुक्यातील बीड (सितेपार) गावात ताज बाबा मेहंदी यांच्या दरबारात मकर संक्रांतीनिमित्त तीन दिवसीय यात्रेचे आयोजन केले जाते ही यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक मानले जाते तसेच ताज मेहंदी बाबा यांना दारू सोडविणारे बाबा म्हणून सुद्धा ओळखले जाते दरवर्षी यात्रेमध्ये विविध राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.

Body:14 जानेवारी हे बाबा ताज मेहंदी यांचा जन्मदिवस या दिवसापासूनच दरवर्षी बीड येथे ही यात्रा भरविली जाते 1994 मध्ये बीड गावात या बाबा ताज मेहंदी यांच्या दरबाराची निर्मिती करण्यात आली आणि तेव्हापासून दरवर्षी इथे ही तीन दिवशी यात्रा भरते ताज मेहंदी बाबा यांच्या दरबारात भरणारी ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक आहे कारण ताज मेहंदी हे मुस्लिम असले तरी त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूंची संख्या सर्वात जास्त आहे एवढेच नाही तर संस्थांची सर्व कमिटी ही हिंदू सांभाळतात लोकांना होणाऱ्या विविध शारीरिक आणि मानसिक अडचणी सोडविण्यासाठी इथे लोक येतात मात्र सर्वात जास्त लोक हे दारु सोडविण्यासाठी इथे येतात एकदा जो इथे बाबाच्या चरणी येतो त्याची दारू सुटते असा विश्वास लोकांचा आहे आणि म्हणूनच त्यांना दारू सोडविणारे बाबा म्हणून सुद्धा ओळखले जाते त्यामुळेच प्रत्येक संक्रातीच्या काळात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या विविध राज्यातून लोक मोठ्या संख्येने येथे येतात.

दारुमुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत मात्र इथे आल्यावर दारू सुटल्याने सुखी संसाराची नवीन सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच तीन दिवसांच्या मुक्कामाला संपूर्ण कुटुंबासह लोक येतात. याठिकाणी तीन दिवस मोठी जत्रा भरते, भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो केवळ दारूच नाही तर कोणाला भूत बाधा झाली तरी इथे त्याला मुक्ती मिळते एवढेच काय तर कॅन्सर सारख्या रोगापासून इथे आल्यावर मुक्ती मिळते असा अनुभव लोक सांगतात.
बाबांचा मृत्यू झालेला आहे तरी इथे आल्याने लोकांची दारू सुटते असा त्यांचा दावा आहे ही श्रद्धा की अंधश्रद्धा याचा विचार करण्यापेक्षा दारुमुळे लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचले हे महत्त्वाचे आणि जिल्ह्यात दारूबंदी व्हावी या मागणीसाठी मोठे आंदोलन होतात त्यापेक्षा हा उपाय जास्त कारगर दिसत आहे.
बाईट : चंदू लांजेवार, भाविक
प्रभुदास बाळबुधे, भावीक आणि दरबार निर्मितीकार

Conclusion:
Last Updated : Jan 14, 2020, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.