ETV Bharat / state

स्वतःचा कुटुंबाचे सत्यानाश करणाऱ्याच्या हाती देशाची पुढची सत्ता देऊ नका, प्रकाश आंबेडकर

ज्या व्यक्तीला स्वतःचे कुटुंब सांभाळता नाही, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा सत्यानाश केला अशा माणसाच्या हातात पुढची ५ वर्षांची सत्ता देऊ नका, अन्यथा देशाचाही सत्यानाश होईल, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 3, 2019, 12:07 AM IST

भंडारा - ज्या व्यक्तीला स्वतःचे कुटुंब सांभाळता नाही, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा सत्यानाश केला अशा माणसाच्या हातात पुढची ५ वर्षांची सत्ता देऊ नका, अन्यथा देशाचाही सत्यानाश होईल, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली. ते आज भंडारा येथे वंचित बहुजन आघाडी उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते.

सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कारू नान्हे यांच्या प्रचारासाठी आज मंगळवारी प्रकाश आंबेडकर दसरा मैदानावर आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. देशातील लोकांना मोठे पक्ष कधीही सत्तेत स्थान देत नाहीत. सर्वसामान्य लोकांच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लोकसभेची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचे पहिले यश म्हणजे उमेदवारी जाहीर होताच महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांनी पराभवापोटी आपली उमेदवारी मागे घेतली. भंडारा जिल्ह्यातील प्रफुल्ल पटेल आणि माढामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. यावरून आपल्या पक्षातील लोकांचा प्रभाव किती आहे हे लक्षात येते, असे ते म्हणाले.

धर्माच्या, जातीच्या नावावर सुरू असलेले राजकारण आणि त्या माध्यमातून निवडून येण्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीमुळे थांबणार आहे. कारण या पक्षामध्ये केवळ एका जातीच्या माणसाला पुढे आणले जात नाही तर सर्वधर्मीय लोकांना सत्तेत आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आंबेडकर म्हणाले.

मोदी सरकारच्या ५ वर्षांच्या काळात देश अधोगतीला गेला आहे. नोटबंदी सारख्या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ही नोटबंदी म्हणजे अवैध पैसा वैध करण्यासाठी मोदी सरकारने केलेले षड्यंत्र होते. त्यांच्या सरकारच्या काळात केवळ मोठ्या उद्योगपतींचा विचार केला गेला. मात्र, देशाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या शेतकऱ्यांचे शोषण झाल्याची टीका त्यांनी केली. देश वाचवायचा असेल, देशाचा सत्यानाश करायचा नसेल तर येणार्‍या काळात बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या आणि देश सुरक्षित ठेवा, असे आव्हान त्यांनी लोकांना केले.

Intro:Anc : ज्या व्यक्तीला स्वतःचं कुटुंब सांभाळता नाही आला ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा सत्यानाश केला अशा माणसाच्या हातात देशात पुढची पाच वर्षांची सत्ता देऊ नका अन्यथा देशाचा ही सत्यानाश होईल असे खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदीला संबोधित करत केली. ते आज भंडारा येथे वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असताना हे विधान केले.

Body:वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कारू नान्हे यांच्या प्रचारासाठी 2 एप्रिल ला प्रकाश आंबेडकर हे दसरा मैदानावर आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी आले होते.
देशातील लोकांना मोठे पक्ष कधीही सत्तेत स्थान देत नाहीत अशा सर्व लोकांना सत्तेत आणण्यासाठी नवे सत्ता त्यांच्या हातात देऊन त्यांच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ची स्थापना करून त्यादृष्टीने लोकसभेची निवडणूक आम्ही लढवीत आहोत.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांचा पहिला यश म्हणजे उमेदवारी जाहीर होतात महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांनी पराभव पोटी आपली उमेदवारी मागे घेतली भंडारा जिल्ह्यातील प्रफुल पटेल आणि माढामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही माघार घेतली यावरून आपल्या पक्षातील लोकांचा प्रभाव किती आहे हे लक्षात येते.

धर्माच्या नावावर जातीच्या नावावर सुरू असलेले राजकारण आणि त्या माध्यमातून निवडून येण्याची ही प्रकार वंचित बहुजन आघाडी मुळे थांबणार आहे कारण या पक्षामध्ये केवळ एका जातीच्या माणसाला पुढे आणले जात नाही तर सर्वधर्मीय लोकांना सत्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यांच्या पक्षातील बहुतांश उमेदवार हे उच्चशिक्षित आणि समाजकारणी असल्याने त्यांना सर्वसामान्य लोकांच्या समस्येची जाणीव आहे
मोदी सरकारच्या पाच वर्षाच्या काळात देश अधोगतीला गेला नोटबंदी सारख्या फालतू निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांना मोठ्या अडचणींचा सामना झाला असतानाच ही नोट बंदी म्हणजे अवैध पैसा वैद्य करण्यासाठी मोदी सरकारने मुद्दाम केलेली व्हिडीओ होती त्यांच्या काळात केवळ मोठ्या उद्योगपती चा विचार केला गेला मात्र देशाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या शेतकरी ढिवर कोळी चांभार यांचा मात्र शोषणच केला गेला.
मोदी बद्दल बोलताना त्यांनी म्हटलं ज्या व्यक्तीला स्वतःचा कुटुंब सांभाळता आला नाही ज्या व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबाचा सत्यानाश केला तो देशाचा कसा भला करेल देश वाचवायचा असेल देशाचा सत्यानाश करायचा नसेल र येणार्‍या काळात बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या आणि देश सुरक्षित ठेवा असे आव्हान त्यांनी लोकांना केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.