ETV Bharat / state

दुचाकीच्या वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या - मुलानेच केली वडिलांची हत्या

वडील आणि मुलामध्ये झालेल्या किरकोळ वादातून मुलाने काठीने मारहाण केल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे घडली आहे. घटनेनंतर आरोपी मुलगा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

bhnadara
दुचाकीच्या वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या
author img

By

Published : Mar 6, 2020, 5:24 PM IST

Updated : Mar 6, 2020, 5:59 PM IST

भंडारा - दुचाकीची चावी देण्याच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यात काठीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वडिलांचा खून केल्यानंतर आरोपी मुलगा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ताराचंद पिसाराम टिचकुले (वय 52) असे या घटनेत मृत झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर लोकेश ताराचंद टिचकुले (वय 21) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

दुचाकीच्या वादातून मुलानेच केली वडिलांची हत्या

ताराचंद आणि त्यांचा मुलगा लोकेश यांच्यामध्ये नेहमी काही ना काही कारणावरून वाद होत होते. गुरुवारी दुपारी लोकेश शेतातून घरी आल्यानंतर त्याने येताच वडील ताराचंद यांना दुचाकीची चावी मागितली. मात्र, वडिलांनी चावी देण्यास नकार देताच त्यांच्यात वाद झाला. या वादात वडिलांनी लोकेशला अंगणात पडलेल्या काठीने मारहाण सुरू केली. त्यामुळे संतापलेल्या लोकेशने त्याच काठीने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे काही क्षणातच ताराचंद रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. काठीचा आघात एवढा जोरदार होता की, यात ताराचंद यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - भंडाऱ्यात नागरिकांनी अशोक लेलँड कंपनीविरुद्ध केले टोमॅटो फेको आंदोलन केले

दरम्यान, ताराचंद हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुले असून लोकेश हा त्यांचा लहान मुलगा आहे. लोकेश नेहमी वडिलांसोबत काही ना काही कारणाने वाद घालत असे. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मोठा मुलगा जितेंद्र याने लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी लोकेश विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.

Last Updated : Mar 6, 2020, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.