ETV Bharat / state

भंडाऱ्यात आज 6 कोरोनाबाधितांची भर, तर 6 जण कोरोनामुक्त - कोरोना विषाणू

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 32 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 48 वर पोहोचली आहे. तर सध्या 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Bhandara Corona News
भंडारा कोरोना बातमी
author img

By

Published : Jun 10, 2020, 6:36 PM IST

भंडारा - जिल्ह्यात आज बुधवारी एकाच दिवशी 6 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तर 6 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 32 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 48 वर पोहोचली आहे. तर सध्या 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज आढळलेल्या 6 लोकांपैकी लाखांदूर तालुक्यातील 3 व्यक्तीचा, लाखनी तालुक्यातील 2 व्यक्तींचा आणि भंडारा तालुक्यातील एक व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लाखनी तालुक्यात 36 वर्षीय आणि 42 वर्षीय दोन तरुण हे चेन्नई येथून 4 जूनला आले होते या दोघांनाही अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तर भंडारा तालुक्यातील 26 वर्षीय तरुण 2 जूनला दिल्लीवरून आला होता. लाखांदूर तालुक्यातील 20 वर्षीय तरुण 13 मे ला पुणे येथून आला होता. तर 26 वर्षीय दोन तरुण 14 आणि 18 तारखेला एक औरंगाबाद आणि एक उत्तर प्रदेश येथून आले होते. या सर्व लोकांचा घश्यातील नमुने अहवाल 8 जूनला तपासणीसाठी पाठवले होते. 10 जूनला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 48 इतकी आहे. यामध्ये क्रियाशील रुग्ण 16 आहेत. तर 32 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 2507 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 48 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2454 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 5 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

आज 10 जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये 18 व्यक्ती दाखल असून आतापर्यंत 375 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 241 भरती आहेत. 1890 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई व इतर राज्यातून 41 हजार 53 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 31 हजार 316 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 9 हजार 737 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.