ETV Bharat / state

भंडारा रुग्णालयातील थरार; स्वतःचा जीव धोक्यात घालून 'त्यांनी' वाचवले सात जीव

गौरव रेहपाळे, जितेंद्र टाले आणि शिवम मडावी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दार उघडताच तिथून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता आत मध्ये संपूर्णपणे अंधार होता आणि या धुरामुळे आत जाणे अशक्य होते. आत गेल्यास त्यांचाही जिवास धोका होऊ शकत होता, मात्र मुलांना वाचविणे त्यांचे कर्तव्य आहे, याची त्यांना जाण होती. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही.

स्वतःचा जीव धोक्यात घालून 'त्यांनी' वाचवले सात जीव

author img

By

Published : Jan 11, 2021, 7:02 AM IST

Updated : Jan 11, 2021, 7:54 AM IST

भंडारा - जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात आग लागून शुक्रवारी मध्यरारात्री एक हृदयद्रावक घटना घडली. यामध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. मात्र, या दुर्घटनेत एक दिलासादायक घटना घडली ती म्हणजे सात बालकांना वाचविण्यात येथील सुरक्षा रक्षकांस यश आले. आगीच्या घटना घडली त्यावेळी प्रसंगावधान राखत धाडसाने या बालकांना वाचवणाऱ्या सुरक्षारक्षकांसोबत ईटीव्ही भारतने केलेली खास बातचीत.

स्वतःचा जीव धोक्यात घालून 'त्यांनी' वाचवले सात जीव
सर्वत्र काळोख होता, धूर पसरलेला होता, काहीही दिसत नव्हते-जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकाच्या केअर सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर तिथे आग लागली. यावेळी रुग्णालयात सुरक्षा गार्ड म्हणून कामावर असलेले गौरव रेहपाळे, जितेंद्र टाले आणि शिवम मडावी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दार उघडताच तिथून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत होता आत मध्ये संपूर्णपणे अंधार होता आणि या धुरामुळे आत जाणे अशक्य होते. आत गेल्यास त्यांचाही जिवास धोका होऊ शकत होता, मात्र मुलांना वाचविणे त्यांचे कर्तव्य आहे, याची त्यांना जाण होती. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. अग्निशामकच्या शिडीचा वापर करत दुसऱ्या दारातून रूममध्ये प्रवेश-समोरच्या दारातून जाणं अशक्य असल्याने अग्निशामक गाडीच्या सीडीच्या माध्यमातून त्यांनी आग लागलेल्या वार्डचे मागचे दार तोडून आत प्रवेश मिळविला. सुरुवातीला इन बॉर्न वार्डातील सात मुलांना बाहेर काढले. त्यानंतर आऊट बॉर्न वॉर्डमध्ये प्रवेश मिळविले. अगोदर शक्य तेवढे दार खिडक्या उघडून घेतल्या आणि धोका पत्करून प्रवेश मिळविला पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्या वार्डमध्ये असलेले दहाही मुले मरण पावली होती. यापैकी तीन मुलांचा जळून मृत्यू झाल्याचा प्रथमदर्शनी दिसले. उर्वरित सर्व बाळ हे गुदमरून मरण पावले होते, असे त्यांनी सांगितले. 7 मुलांना वाचण्याचा जेवढा आनंद आम्हाला होत आहे. त्यापेक्षाही वाईट आम्हाला त्या 10 मुलांना वाचविण्यात अपयश मिळाले, त्याचे वाटत असल्याची भावना या सुरक्षा रक्षकांनी यावेळी व्यक्त केली.बेबी केअर सेंटर मध्ये फायर आलाराम नव्हते- हे नवजात मुले ज्या अतिदक्षता विभागातील बेबी केअर सेंटर मध्ये ठेवले जातात तिथे पालकांना प्रवेश नसतो. या बाळांची पूर्ण जबाबदारीही ही तेथील नर्सवर असते. एवढ्या जबाबदरीचे काम असूनही या वार्ड मध्ये फायर सेफ्टी, फायर स्प्रिंकलर, स्मोक अलार्म उपलब्ध नव्हते. या सुविधा उपलब्ध असत्या तर शॉर्टसर्किट झाल्यानंतर धूर बाहेर आला असता, आणि या सिस्टममुळे सर्वांना ते पटकन लक्षात आले असते आणि त्यांना वेळेच्या आत सर्वांना बाहेर सुखरूप काढता आले असते. मात्र या सुविधा नसल्यामुळे दहा मुलांना त्यांचा जीव विनाकारण गमवावा लागला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

भंडारा रुग्णालयातील या दुर्दैवी घटनेत 10 बालकांपैकी 3 जणांचा होरपळून तर 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन दोषीवर कारवाई करण्याच्या सुचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेर राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Last Updated : Jan 11, 2021, 7:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.