भंडारा : वाळू माफियाने ( Sand Mafia ) केलेल्या हल्ल्यानंतर मोहाडी तहसीलदार यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा यागावी घडली आहे. गोळीबार झाल्याची ही घटना जिल्ह्यात हवेसारखी पसरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटना स्थळी जावून पाहणी केली. तहसीलदार यांच्या तक्रारीनंतर मोहाडी येथे गुन्हा दाखल झाला case registered complaint of Tehsildar असून एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.
जेसीबी द्वारे टिप्परमध्ये वाळू घालण्याचा काम सुरू : मिळालेल्या माहितीनुसार मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी साठवलेली वाळू जेसीबी द्वारे टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. तहसीलदार कारंडे यांनी त्यांच्या चमूसह रोहा येथे प्रत्यक्षात भेट दिली असता जेसीबी द्वारे टिप्परमध्ये वाळू घालण्याचा काम सुरू होता. तहसीलदार यांनी तो काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी असा आव्हान जेसीबी चालकाला दिला. मात्र जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्या द्वारे हल्ला चढविला मात्र तहसीलदार यांनी स्वतःचा बचाव केला, त्यानंतर जेसीबी चालकाने तिथून जेसीबी घेवून पळ काढला.
गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून पळाला : मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धावतहसीलदार यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने जीव घेणा हल्ला केला. दोनदा झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे तहसीलदार यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ त्यांच्याकडे असलेली लायसन धारक बंदुकीने हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी तिथेच सोडून पळून गेला. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदार यांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीपी आणि टीप्पर ताब्यात घेतले. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यासह घटनास्थळी जाऊन चौकशी केली.
जेसीपी चालकाला अटक करण्यात आली : मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी चालक, मालक, तसेच टिप्पर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम 353, 379 नुसार गुन्हा नोंद केला गेला आहे. सध्या जेसीपी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून अटक केली जाईल असे पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी यावेळी सांगितले. माझ्यावर जीव घेणा हल्ला झाल्याने शेवटी नाईलाजास्तव मला माझ्या संर्क्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागेल आहे. या वाळू माफियांचे जेसीबी आणि टीप्पर जप्त केली. त्याच्या विरुध्द मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे असे तहसीलदार कारंडे यांनी सांगितले.