ETV Bharat / state

भंडाऱ्यात मद्य-बिअर विक्रीचे वेगवेगळे नियम, जाणून घ्या जिल्ह्यात - तालुक्यात काय मिळणार - bhandara corona update

भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी आदेश काढून शनिवारपासून ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्याचे तसेच भंडारा तालुक्यात फक्त बिअर शॉपी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

शनिवारपासून भंडारा जिल्ह्यात मद्य विक्रीला सुरुवात

author img

By

Published : May 9, 2020, 5:27 PM IST

Updated : May 9, 2020, 5:52 PM IST

भंडारा - जिल्ह्यात शनिवारपासून मद्य विक्रीला सुरुवात झालेली आहे. 4 मेला राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मद्यविक्रीला सुरुवात झाली होती. मात्र, भंडारा जिल्हाधिकारी यांनी यासाठी परवानगी नाकारली होती. मात्र, शुक्रवारी आदेश काढून शनिवारपासून ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्याचे तसेच भंडारा तालुक्यात फक्त बिअर शॉपी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

भंडाऱ्यात मद्य-बिअर विक्रीचे वेगवेगळे नियम, जाणून घ्या जिल्ह्यात - तालुक्यात काय मिळणार

भंडारा हा ऑरेंज झोनमध्ये असलेला जिल्हा आहे. इथे फक्त एक कोरोनाबाधित रुग्ण असून केवळ एक कंटेनमेंट झोन आहे. त्यामुळे भंडारा नगरपालिका हद्दीतील केवळ बिअर शॉपी सुरू करण्यात आल्या आहेत. देशी दारू किंवा विदेशी दारू या दुकानांना उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. याउलट ग्रामीण भागातील सर्व देशी दारूचे दुकाने तुमसर, मोहाडी, साकोली, लाखणी, लाखांदूर आणि पवनी या उर्वरित सहा तालुक्यांमध्ये शहराच्या बाहेरील सर्व प्रकारच्या दारूची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. केवळ शहराच्या आतमधील दारूची दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहे.

साकोली तालुक्यात शहराबाहेर असलेल्या दारूच्या दुकानावर सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन मोठ्या रांगा या दारूच्या दुकानाच्या पुढे लागल्या होत्या. दुपारी 1 नंतर तर चांगलीच उन्ह तापू लागली. मात्र, तरीही तळीरामांची हिंमत कमी झाली नाही आणि दारू मिळविण्यासाठी त्यांनी कित्येक तास रांगेमध्ये उभे राहून 2 महिन्यांची प्रतीक्षा संपविली.

दारू दुकानासमोर प्रत्येक दारू खरेदी करणाऱ्याचे थर्मल टेस्टिंग करून सॅनिटाईझ करून नंतर त्यांना दारू खरेदीसाठी समोर जाता येत होते. सध्यातरी हे तळीराम सोशल डिस्टन्सिंग अगदी तंतोतंत पाडत आहेत. 11 ते 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. आज बरेच दुकानासमोर सर्व व्यवस्था करण्यासाठी उशीर झाल्याने काही दुकाने उद्यापासून नियमित सुरू होणार आहेत तर काहींने उशिरा दुकाने सुरू केली. प्रत्येक दुकानासमोर 2 पोलीस शिपाई नेमण्यात आले आहेत.

Last Updated : May 9, 2020, 5:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.