ETV Bharat / state

Mohadi Panchayat Samiti Chairman : रिक्षा चालक झाला पंचायत समितीचा सभापती - मोहाडी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक

मोहाडी पंचायत समितीच्या सभापती पदावर वरठी गणातून निवडून आलेले रिक्षाचालक रितेश वासनिक यांची सभापती म्हणून निवड झाली ( Riksha Driver Became Mohadi Panchayat Samiti Chairman ) आहे.

रितेश वासनिक
रितेश वासनिक
author img

By

Published : May 6, 2022, 9:21 PM IST

भंडारा - लोकशाहीत सर्वांना सारखी संधी मिळावी यासाठी दिलेल्या आरक्षणाचा फायदा आज ( 6 मे ) भंडारा जिल्ह्यातील एका रिक्षा चालकाला झाला आहे. आयुष्यात कुणालाही कमी लेखू नये. आज चरितार्थासाठी वाट्टेल ते काम करणारा उद्या राजकारणाच्या उच्च पदावर पोहचू शकतो. आता हेच बघा ना, मोहाडी पंचायत समितीच्या सभापती पदावर वरठी गणातून निवडून आलेले रिक्षाचालक रितेश वासनिक यांची सभापती म्हणून निवड झाली आहे. ते मोहाडी पंचायत समितीचे 17 वे सभापती म्हणून विराजमान झाले ( Riksha Driver Became Mohadi Panchayat Samiti Chairman ) आहेत.

रितेश वासनिक हे सभापती पदावर अविरोध निवडून आले आहेत. आज झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापती रितेश वासनिक व उपसभापती बबलू मलेवार सभापती व उपसभापतीच्या खुर्चीवर विराजमान झाले. विशेष म्हणजे मोहाडी येथे भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचाच सभापती होईल, असे गृहीत होते. मात्र, सभापती आरक्षण सोडतीत मोहाडी पंचायत समितीचा सभापती पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला होते. पण, भाजपाकडे त्या गटाचा एकही उमेदवार नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडे सभापती पदाची आयती संधी चालून आली.

रितेश वासनिक प्रतिक्रिया देतान

आज झालेल्या निवडणुकीत सभापती पदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून रितेश वासनिक यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. तसेच, उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून बाणा सव्वालाखे तर भाजपकडून बबलू मलेवार यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाचे रितेश वासनिक बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. तर, उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे बबलू मलेवार 8 विरुद्ध 6 च्या फरकाने निवडून आले. निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने एकच जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाने विजयी रितेश यांनी रिक्षावरुन मिरवणूक काढली.

माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. कधीही आयुष्यात विचार केला नव्हता की मी सभापती होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेल्या समान संधीमुळे मला आज सभापती होता आले आहे. माझ्या निवडीचे श्रेय प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते मंडळींना देतो, असे नवनिर्वाचित सभापती रितेश वासनिक यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - India Israel Friendship : 'बेस्ट’मधून भारत-इस्त्रायल मैत्रीला उजाळा, बसवर भारत इस्त्रायल मैत्रीचे पोस्टर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.