ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात आमदारांची बंडखोरी

author img

By

Published : Oct 7, 2019, 10:25 PM IST

नामांकन अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले. मात्र, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

तहसिलदार कार्यालय

भंडारा - नामांकन अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले. मात्र, भाजप शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीत नक्कीच रंगत येणार आहे. आमदारांची ही बंडखोरी त्यांना विजयापर्यंत नेते की त्यांच्या बंडखोरीमुळे प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी फायद्याची ठरते हे 24 तारखेच्या निकालानंतर पुढे येईल.

हेही वाचा - परिणय फुके यांनी मला षडयंत्र करून फसवले, आमदार चरण वाघमारेंचा आरोप

तुमसर विधानसभा क्षेत्रातून विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभे राहिल्याने तुमसर विधानसभा क्षेत्रात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडीचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्याविरुद्ध अपक्ष चरण वाघमारे विरुद्ध भाजपचे प्रदीप पडोळे अशी तिरंगी लढत होणार आहे.

तर भंडारा विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उभे राहिले आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात युतीचे उमेदवार अरविंद भालाधरे विरुद्ध अपक्ष नरेंद्र भोंडेकर विरुद्ध आघाडीचे अधिकृत उमेदवार जयदीप कवाडे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.

हेही वाचा - परिणय फुकेंना तेली समाजाचा प्रखर विरोध; दिले विरोधात नारे

ज्या विधानसभेवर सर्व जिल्ह्याची नजर टिकून आहे, त्यात साकोली विधानसभेतून काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, असे असले तरी या विधानसभा क्षेत्रात आघाडीचे उमेदवार नाना पटोले विरुद्ध युतीचे उमेदवार परिणय फुके यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर बंडखोर माजी आमदार सेवक वाघाये हे मतांचे विभाजन करण्यापलीकडे त्यांची भूमिका सध्या दिसत नाही.

हेही वाचा - मी जिल्ह्याचा पालकमंत्री, ही माझी कर्मभूमी, मग मी बाहेरचा कसा? - परिणय फुके

Intro:ANC : भंडारा जिल्ह्याच्या तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये आमदारांनीच बंडखोरी केली आहे.
नामांकन अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले मात्र भाजपा शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये आमदारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली त्यांच्या बंडखोरीमुळे निवडणुकीत नक्कीच रंगत येणार असून आमदारांची ही बंडखोरी त्यांना विजयापर्यंत नेते की त्यांच्या बंडखोरीमुळे विरुद्ध पक्षातील उमेदवारांना निवडणूक जिंकण्यासाठी फायद्याची ठरते हे 24 तारखेच्या निकालानंतर पुढे येईल.

Body:तुमसर विधानसभा क्षेत्रातून विद्यमान आमदार चरण वाघमारे यांनी भाजपशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभे राहिल्याने तुमसर विधानसभा क्षेत्रात आता त्रिकोणी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेसचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्याविरुद्ध अपक्ष चरण वाघमारे विरुद्ध भाजपाचे प्रदीप पडोळे अशी त्रिकोणी लढत होणार आहे.
तर भंडारा विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उभे राहिले आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात भाजपा -शिवसेना -रिपाई चे उमेदवार अरविंद भालाधरे विरुद्ध अपक्ष नरेंद्र भोंडेकर विरुद्ध काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस- पिरी पा चे अधिकृत उमेदवार जयदीप कवाडे यांच्या त्रिकोणी लढत होणार आहे.
ज्या विधानसभेवर सर्व जिल्ह्याची नजर टिकून आहे त्यात साकोली विधानसभेतून काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर आपला उमेदवारी अर्ज भरला आहे मात्र असे असले तरी या विधानसभा क्षेत्रात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले विरुद्ध भाजपा- शिवसेनेचे उमेदवार परिणय फुके यांच्यात सरळ लढत होणार आहे तर बंडखोर आमदार सेवक वाघाये हे मतांचे विभाजन करण्यापलीकडे त्यांची भूमिका सध्या दिसत नाही आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.