ETV Bharat / state

शिवभोजन थाळी सुरू होण्यापूर्वीच येथे मिळते १० रुपयात जेवण, वर्षभरात हजारोंनी घेतला आस्वाद - rajmata jijau foundation

'राजमाता जिजाऊ फाउंडेशन'च्या माध्यमातून जिल्ह्यातील काही तरुणांनी एकत्र येत रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयात पोटभर जेवण द्यायचे ठरविले. यासाठी त्यांनी पैसै जमा करून १९ फेब्रुवारी २०१९ पासून या कामाची सुरुवात केली. यामध्ये सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत लोकांना भात आणि भाजी असे पोटभर जेवण दिले जाते. केवळ १० रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळते म्हणून रोज सकाळ संध्याकाळ मिळून जवळपास चारशे लोक येथे जेवण करतात.

शिवभोजन थाळी सुरू होण्यापूर्वीच येथे मिळते १० रुपयात जेवण

author img

By

Published : Feb 20, 2020, 8:15 PM IST

भंडारा - महाराष्ट्र शासनाने नुकतच गरजू लोकांसाठी १० रुपयात शिवभोजन थाळीची सुरुवात केली. मात्र, जिल्ह्यात १० रुपयांत पोटभर जेवण देण्याचा उपक्रम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. काही तरुणांनी हा उपक्रम सुरू केला असून या स्तुत्य उपक्रमाची नागरिक स्तुती करत आहेत. या उपक्रमाला आता काही सामाजिक संघटनांनीही मदत करण्यास सुरुवात केली आहे. आज(गुरुवार) या उपक्रमाला १ वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत जवळपास ७० ते ७५ हजार गरजूंनी येथे जेवण केले आहे.

शिवभोजन थाळी सुरू होण्यापूर्वीच येथे मिळते १० रुपयात जेवण

'राजमाता जिजाऊ फाउंडेशन'च्या माध्यमातून जिल्ह्यातील काही तरुणांनी एकत्र येत रुग्णालयात येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना १० रुपयात पोटभर जेवण द्यायचे ठरविले. यासाठी फाउंडेशनच्या लोकांनी सुरुवातीला स्वतःकडील हजार-हजार रुपये जमा करून १९ फेब्रुवारी २०१९ पासून या कामाची सुरुवात केली. यामध्ये सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत लोकांना भात आणि भाजी असे पोटभर जेवण दिले जाते. केवळ १० रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळते म्हणून रोज सकाळ संध्याकाळ मिळून जवळपास चारशे लोक येथे जेवण करतात.

आज या उपक्रमाला वर्ष झाले असले तरी सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी अतिशय अडचणीचा होता. कारण, ज्या तरुणांनी हा उपक्रम सुरू केला ते मध्यमवर्गीय असून त्यांच्याकडे काही काळाने पैशाची अडचण सुरू झाली. त्यामुळे काहीच महिन्यानंतर हा उपक्रम बंद करावा, असा विचारही त्यांच्या मनात आला. मात्र, हिम्मत न हारता त्यांनी कधी स्वतःकडून तर कधी उसने मागून तांदूळ, तेल, भाजी म्हणून रोजच्या जेवणाची सोय करण्याचा उपक्रम नियमित सुरू ठेवला.

हेही वाचा - भंडाऱ्यातील २ खेळाडूंना मिळाला मानाचा छत्रपती पुरस्कार

म्हणतात ना, तुम्ही इतरांबद्दल विचार करून जर चांगले कार्य करत असाल तर त्या कार्याला सहकार्याचे आणि मदतीचे हात मिळायला सुरुवात होतात. इथेही तसंच झाले. काही महिन्यानंतर या उपक्रमाला हळूहळू लोक जुळायला लागले. काही लोकांनी तांदूळ, भाज्यांचा खर्च उचलला तर काही लोकांनी किराणा आणून दिला. आता बरेचदा लोक त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त येथे पैसे किंवा धान्य देतात. त्यामुळे हा उपक्रम नित्यनियमाने सुरू आहे. तर, काही निवृत्त लोक इथे येऊन नोंदणी करून पैसे घेऊन लोकांच्या जेवणाची व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी योगदान करतात.

मागील वर्षभरात जवळपास ७० ते ७५ हजार लोकांनी या ठिकाणी जेवण केले. येणाऱ्या काळात येथे जेवणाऱ्या व्यक्तींना केवळ भात आणि भाजी न देता पोळ्यासुद्धा देण्याची इच्छा या तरुणांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना मोठे आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे. शासनातर्फेही त्यांना आर्थिक मदत मिळाली तर लोकांना अजून चांगले जेवण मिळू शकते. इथे जेवणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाची स्तुती करत त्यांच्यामुळे आमच्या सारख्या गरजू लोकांना मदत होत असल्याचेही सांगितले.

हेही वाचा - भाजप नगराध्यक्ष, नगरसेवकांनी एकमेकांवर लावले भ्रष्टाचाराचे आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.