भंडारा - हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत आज (8 जानेवारी) जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या शेतकऱ्यांनी गहू पिकाव्यतिरिक्त भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्याला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - कापूस ओला झाला अन् तुरीचा बहर गळून गेला...
सकाळ पासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामानात बदल झाल्याने रोगराईचे प्रमाण वाढण्याचीदेखील भीती आहे.