ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात 2 शाळांच्या पटांगणात शिरले पावसाचे पाणी; शाळेला आले तलावाचे स्वरूप

सलग दोन दिवस शाळेला सुट्टी दिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रांगनात मुरुम टाकून उंच करण्याची मागणी पालक आणि शिक्षक वर्ग करत आहेत.

author img

By

Published : Aug 2, 2019, 11:32 PM IST

भंडारा

भंडारा - जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे. लाखांदूर तालुक्यातील एका शाळेच्या पटांगणात आणि पवनी तालुक्याच्या एका शाळेच्या पटांगणात पाणी साचले होते. त्यामुळे शाळेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थांचे नुकसान होत आहे.

शाळांच्या पटांगणात शिरले पावसाचे पाणी; शाळेला आले तलावाचे स्वरूप

मागील दोन दिवसात पवनी आणि लाखांदूर तालुक्यता अतिवृष्टी झाली आहे. पवनी तालुक्यात 106 मिमी तर, लाखांदूर तालुक्यात 67 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. याच पावसाचा फटका या दोन्ही तालुक्यातील 2 शाळांनाही बसला आहे. लाखंदूर तालुक्यातील विरली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगनात पाणी साचले आहे. इमारतीच्या एका बाजूला छोटेखानी तलाव तर आवार भिंतीच्यालगत नाला असल्याने पावसाच्या पाण्याने या नाल्यातील पुराचे पाणी भिंतींच्या खालून शाळेच्या प्रांगनात शिरले आहे,

rain

त्यामुळे तलावात शाळा की शाळेत तलाव, ही स्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती पवनी तालुक्यातील पालोरा येथील जिल्हा परिषदमध्येही शाळेच्या प्रांगणात पाणी साचले आहे. प्रांगण हे खोल भागात असून आवार भिंतीमुळे पाणी बाहेर निघण्यास अडचण निर्माण होते. 106 मिमी पाऊस झाल्याने संपूर्ण प्रांगणात पाणी साचले होते. शाळेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. परिणामी शिक्षकांनी शाळेला नाईलाजास्तव सुट्टी दिली आहे.

rain
शाळांच्या पटांगणात शिरले पावसाचे पाणी

Intro:Body:Anc: - भंडारा जिल्ह्यात मागिल दोन दिवसापासुन सुरु संततधार पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे, लाखांदूर तालुक्यातील एका शाळेच्या पटांगणात आणि पवनी तालुक्याच्या एका शाळेच्या पटांगणात पाणी साचल्याने शाळेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, विद्यार्थांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर झाल्याने विद्यार्थांचे नुकसान होत आहे.

मागील दोन दिवसात पवनी आणि लाखांदूर तालुक्यता अतिवृष्टी झाली पवनी तालुक्यात 106 मामी तर लाखांदूर तालुक्यात 67 मामी पाऊस आला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. याच पावसाचा फटका या दोन्ही तालुक्यातील 2 शाळांनाही बसला आहे. लाखंदुर तालुक्यातील विरली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगनात पाणी साचले आहे, इमारतीच्या एका बाजूला छोटेखानी तलाव (बोडी) तर आवार भिंतीच्या लगत नाला असल्याने पावसाच्या पाण्याने या नाल्यातिल पूराचे पाणी भीतींच्या खालून शाळेच्या प्रांगनात शिरले आहे, त्यामुळे तलावात शाळा की शाळेत तलाव ही स्थिति निर्माण झाली आहे, अशीच परिस्थिती पवनी तालुक्यातील पालोरा येथील जिल्ह्या परिषद मध्येही शाळेच्या प्रांगणात पाणी साचले आहे, प्रांगण हे खोल भगत असून आवर भीतीमुळे पाणी बाहेर निघण्यास अडचण निर्माण होते, 106 मिमी पाऊस आल्याने संपूर्ण प्रांगणात पाणी साचले होते, शाळेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांना वर्ग खोक्या पर्यंत पोहचणे शक्य होत नाही. परिणामी शिक्षकांनी शाळेला नाइलाजास्तव सुट्टी दिली आहे.
सलग दोन दिवस शाळेला सुट्टी दिल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे प्रांगनात मुरुम टाकून उंच करण्याची मागणी पालक आणि शिक्षण वर्ग करीत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.