ETV Bharat / state

Nana Patole on Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन असल्याने ते पंतप्रधान होतील - नाना पटोले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन असल्यामुळे ( Rahul Gandhi Have Vision ) आगामी निवडणुकीत राहुल गांधी हेच भारताचे पंतप्रधान होतील. ( Rahul Gadhi Will become PM ) गांधी परिवार हाच काँग्रेसचा मुख्य चेहरा असून काँग्रेस आणि देशातील सर्व नागरिकांना मान्य आहे. 2014 मध्ये सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी खोटे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर देश विकायला काढलेला आहे. देशाचा स्वातंत्र्य धोक्यात आलेला आहे, अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेस पक्ष हेच आशाची किरण दिसत असल्याचा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी व्यक्त केला.

nana patole
नाना पटोले
author img

By

Published : Mar 29, 2022, 12:21 PM IST

Updated : Mar 29, 2022, 12:50 PM IST

भंडारा - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन असल्यामुळे ( Rahul Gandhi Have Vision ) आगामी निवडणुकीत राहुल गांधी हेच भारताचे पंतप्रधान होतील. ( Rahul Gadhi Will become PM ) गांधी परिवार हाच काँग्रेसचा मुख्य चेहरा असून काँग्रेस आणि देशातील सर्व नागरिकांना मान्य आहे. 2014 मध्ये सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी खोटे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर देश विकायला काढलेला आहे. देशाचा स्वातंत्र्य धोक्यात आलेला आहे, अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेस पक्ष हेच आशाची किरण दिसत असल्याचा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी व्यक्त केला.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीने काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबत संवाद साधला

2024मध्ये काँग्रेसला फायदा - भाजपाने सत्तेत येण्यासाठी 2014मध्ये नागरिकांना खोटे आश्वासन दिले त्याची पूर्तता आता भाजप करताना दिसत नाही. पेट्रोलचे दर असतील, महागाई, बेरोजगारी असेल या प्रत्येक गोष्टीत भाजपा सपशेल फेल ठरलेली आहे. एवढेच नाही तर खासगीकरणाचा झपाटा त्यांनी लावलेला आहे. केवळ मूठभर उद्योगपतींसाठी हे भाजप सरकार कार्य करत आहे. त्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना नागरिक भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे 2024ची निवडणूक एक काँग्रेसच्या दृष्टीने सकारात्मक ठरणार आहे. काँग्रेसचे पक्ष नागरिकांच्या दृष्टीने एक आशेची किरण ठरत आहे. जीएसटी लागू केल्यानंतर राहुल गांधी यांनी त्याच्या दुष्परिणामाविषयी सांगितले होते. तसेच कोरोना ही महामारी आहे. यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते. मात्रस भाजपने त्यांच्या या गोष्टीत गांभीर्याने घेतलं नाही. त्याचा दुष्परिणाम नागरिकांना नाहक त्यांचे प्राण गमवावे लागले. राहुल गांधी यांच्याकडे देशासाठी व्हिजन असल्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असा आशावाद प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

कांग्रेस परिवार हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा हृदय - पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी या सर्व परिवारातील लोकांनी देशाची सेवा केलेली आहे आणि हे सत्य देशातील नागरिक आणि कार्यकर्ते मान्य करतात. विरोधकांकडून मुद्दाम गांधी परिवाराबद्दल अपप्रचार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषण देताना नेहमी नेहरूमुळे महागाई वाढल्याचे सांगतात म्हणजे नेहरू अजूनही मोदीच्या स्वप्नात येतात. काँग्रेसचे सर्वच पंतप्रधानांनी देशाला फक्त दिलेला आहे, देशाकडून काही घेतलं नाही. याउलट बीजेपी काँग्रेसला केवळ वाईट बोलून किंवा शिव्या दिल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही आणि त्याचे कारण आहे आठ वर्षे बहुमताची सत्ता असतानाही सरकारने देशाला प्रगतीकडे नेण्यापेक्षा देशाला पन्नास वर्षे मागे नेले आहे आणि त्यामुळे आपल्या चुकीच्या गोष्टी लपविण्यासाठी गांधी परिवाराला बदनाम करण्याचा अपप्रचार सुरू आहे.

हेही वाचा - Aditya Thackeray On Nanar Project : नाणार रिफायनरी प्रकल्प लोकांवर लादला जाणार नाही -आदित्य ठाकरे

तीन पक्षांचे सरकार असले तरी सर्व सुरळीत - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळत असून शिवसेनेवर अन्याय केला जात असल्याचे आरोप करण्यात आला होता. याविषयी नाना पटोले यांना विचारले असता हे तीन पक्षांचे सरकार असल्याने कोणाला कमी कोणाला जास्त अशा गोष्टी होत राहतील. मात्र, त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि पुढचे पाच वर्ष आम्ही सोबत राहून सत्ता चालू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राजकीय द्वेषापोटी ईडीचे दुरुपयोग - भाजप सध्या ईडीचा दुरुपयोग करत आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत कोणावरही रिकव्हरी निघालेले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी भाजपने हे ईडीची कारवाईचे कृत्य सुरू केलेले आहेत. छगन भुजबळ यांना नाहक अडीच वर्ष तुरुंगात घालण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून काहीही निष्पन्न झाले नाही. या उलट त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

Last Updated : Mar 29, 2022, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.