ETV Bharat / state

भंडारा विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी? - bhandara constituency

भंडारा व पवनी तालुका मिळून भंडारा विधानसभा क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. पंधरा वर्षासाठी अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजप आणि शिवसेनेतील अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला नेतृत्वाची संधी मिळेल, अशी आशा आहे. असे वाटत असतानाही 2009 मध्ये शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नरेंद्र भोंडेकर यांना आयात करून उमेदवारी दिली.

भंडारा विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी
author img

By

Published : Sep 20, 2019, 11:38 PM IST

Updated : Sep 23, 2019, 12:38 PM IST

भंडारा - आजपर्यंत सर्वात जास्त वेळा भाजपचे उमेदवार या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 2014 मध्ये भाजपातर्फे रामचंद्र अवसरे हे विजयी झाले होते. भाजपसाठी ही जागा महत्वाची माणल्या जाते. विद्यमान आमदारांची मागील 5 वर्षातील कामगिरी समाधान कारक नसल्याने यावर्षी त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. तर, या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनीही मागील 5 वर्षांत जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यासाठी कोणतेही काम केलेले नाही. तसेच, राष्ट्रवादीच्या पदाधीकाऱ्यांनाही मागील 5 वर्षात विरोधक म्हणून आपली भूमिका ठामपणे मांडता आली नाही. परिणामी, दोन्ही पक्षांचा या क्षेत्रात प्रभाव उरलेला नाही.

भंडारा विधानसभा क्षेत्रात कोण मारणार बाजी?

भंडारा व पवनी तालुका मिळून भंडारा विधानसभा क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. पंधरा वर्षांसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजप आणि शिवसेनेतील अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना आपल्याला नेतृत्वाची संधी मिळेल, अशी आशा आहे. असे वाटत असतानाही 2009 मध्ये शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नरेंद्र भोंडेकर यांना आयात करून उमेदवारी दिली. तर, 2014 मध्ये भाजपने रामचंद्र अवसरे यांना आयात करून उमेदवारी दिली होती. दोन्ही पक्षाच्या भूमिकेला कार्यकर्त्यांसह मतदारांनीही सहमती दाखवत 2009 मध्ये नरेंद्र भोंडेकर यांना पंचावन्न हजार मतांनी त्यात तर 2014 मध्ये रामचंद्र अवसरे यांना 36 हजार मतांनी निवडून दिले. या निवडणुकीत तरी भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी देते की आयुष्यभर केवळ झेंडे पकडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आघाडी आणि युती न झाल्याने 2014 मध्ये सर्वच पक्षाचे उमेदवार मैदानात होते. या निवडणुकीत भाजपचे रामचंद्रराव सर यांना 83 हजार 408 मते मिळाली होती. तर बहुजन समाज पक्षाचे उमेदवार देवांगणा गाढवे यांना 42 हजार 576 मते मिळाली होती. अवसरे हे 38 हजार 832 मतांनी निवडून आले होते. विद्यमान आमदार शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तेव्हा तिसऱ्या स्थानी राहीले होते. त्यांना 42 हजार 766 मते मिळाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला 30 हजार तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अमानत जप्त झाली होती. युती झाल्यास 2009 प्रमाणेच ही जागा आपल्याला मिळावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, विद्यमान आमदार भाजपचाच असल्याने आम्ही ही जागा सोडणार नाही, अशी भुमिका भाजपने घेतली आहे. जर असे झालेच तर नरेंद्र भोंडेकर हे ईतर पक्षातून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात एकूण तीन लाख 70 हजार 690 मतदार आहेत. सध्या भाजपसाठी पोषक वातावरण असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे. तब्बल 23 इच्छुकांनी यासाठी मुलाखती दिल्या आहेत. भाजपने यावेळेस निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिल्यास जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, रामचंद्र गजभिये, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, नगरपालिका उपाध्यक्ष आशु गोंडाने यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तर रामचंद्र अवसरे, कैलास तांडेकर, नरेंद्र पहाडे हे ही रेसमध्ये आहेत. काँग्रेसमधून जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, राजकुमार राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. तर, राष्ट्रवादी मधून महेंद्र गडकरी, चेतक डोंगरे, नितीन तुमाने हे इच्छुक आहेत.

Intro:ANC : माझ्या ptc ने सुरवात करावी

Body:भंडारा विधानसभा हे राजकीय आणि शासकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे या विधानसभेवर आजपर्यंत सर्वच पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत तर सर्वात जास्त वेळा भाजपाचे उमेदवार या विधानसभेत निवडून आले आहेत 2014 मध्ये भाजपातर्फे रामचंद्र अवसरे हे निवडून आले आहेत सध्याही विधानसभेत पोषक असे वातावरण आहे मात्र असे असले तरी विद्यमान आमदारांची मागील पाच वर्षातील कामगिरी समाधान कारक नसल्याने यावर्षी त्याची तिकीट कापण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष खुद्द निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असले तरी मागील पाच वर्षात काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांनी कोणतेही काम केलेले नसल्याने आणि राष्ट्रवादी च्या लोकांनीही मागील पाच वर्षात विरोधकांची भूमिका ठामपणे मांडली नसल्याने दोन्ही पक्षांचा या विधानसभा क्षेत्रात अजिबात प्रभाव उरलेला नाही.

2009 पासून भंडारा व पवनी तालुका मिळून भंडारा विधानसभा क्षेत्राची निर्मिती करून हा क्षेत्र पंधरा वर्षासाठी अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले. हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजपा आणि शिवसेने मधील अनुसूचित जातीच्या बहुसंख्याक असलेल्या दलित कार्यकर्त्यांना आपल्याला नेतृत्वाची संधी मिळेल असे वाटत असताना 2009 मध्ये शिवसेनेने शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून चांभार समाजाच्या नरेंद्र भोंडेकर यांना आयात करून उमेदवारी दिली तर 2014मध्ये भाजपाने रामचंद्र अवसरे या चांभार समाजाच्या व्यक्तीला आयात करून उमेदवारी दिली दोन्ही पक्षाच्या दलित विरोधी या भूमिकेला मतदारांनीही सहमती दाखवत 2009मध्ये नरेंद्र भोंडेकर यांना पंचावन्न हजार मतांनी त्यात 2014 मध्ये रामचंद्र अवसरे यांना 36 हजार मतांनी निवडून दिले. 2019 ही शेवटची संधी भाजपा मध्ये काम करणाऱ्या दलित बांधवांसाठी आहे त्यामुळे या निवडणुकीत तरी भाजपा त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी देते की आयुष्यभर केवळ झेंडे पकडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
2014 च्या निवडणुकीत आघाडी आणि युतीच्या न झाल्याने भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बहुजन पार्टी अशाच साऱ्याच पक्षाचे उमेदवार मैदानात होते या निवडणुकीत भाजपाचे रामचंद्रराव सर यांना 83 हजार 408 मते मिळाली होती तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार देवांगणा गाढवे यांना 42 हजार 576 मते मिळाली होती अवसरे हे 38 हजार 832 मतांनी निवडून आले होते तत्कालिन विद्यमान आमदार शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तिसऱ्या स्थानी राहिले होते त्यांना 42 हजार 766 मते मिळाली होती काँग्रेसच्या उमेदवाराला 30000 राष्ट्रवादीच्या नेत्यांची जमानत झाली होती देवांगणा गाढवे ही बहुजन पक्षाने आयात केलेली उमेदवार होती त्यात दलित समाजाच्या असल्या तरी त्यांचे पती ओबीसी समाजाचे होते त्याचा फायदा त्यांना मतांमध्ये मिळाला मात्र आज बहुजन पक्षात ते नाहीत आणि या पक्षाची या विधानसभेत तशी अजिबात पकड ही नाही.

युती झाल्यास 2009 प्रमाणे शिवसेनेला उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना करीत आहे मात्र 2014 मध्ये भाजपाने शिवसेनेवर आपले वर्चस्व दाखवीत मोठा विजय मिळविला त्यामुळे विद्यमान आमदार भाजपाचा असल्याने आम्ही ही जागा सोडणार नाही अशी भूमिका भाजप येत आहे आणि जर असे झाले तर शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर हे इतर पक्षातून किंवा अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात एकूण तीन लाख 70 हजार 690 मतदार आहेत सध्या भाजपासाठी या विधानसभेत पोषक वातावरण असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश पाहायला मिळतो आहे तब्बल 23 इच्छुकांनी यासाठी मुलाखती दिल्या आहेत भाजपाने यावेळेस निष्ठावंत दलित कार्यकर्त्यांना संधी दिल्यास जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे रामचंद्र गजभिये माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी नगरपालिका उपाध्यक्ष आशु गोंडाने यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते तर चांभार समाजाच्या व्यक्तींना पुन्हा संधी दिल्यास रामचंद्र अवसरे कैलास तांडेकर नरेंद्र पहाडे यापैकी एकाला संधी मिळू शकते काँग्रेसमधून जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे राजकुमार राऊत यांच्या नावाची चर्चा आहे तर राष्ट्रवादी मधून महेंद्र गडकरी चेतक डोंगरे नितीन तुमाने या इच्छुकांच्या नावाची चर्चा आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.