ETV Bharat / state

LOCK-DOWN : बुलडाण्यात शुक्रवारची नमाज अदा करण्याऱ्यांविरुद्ध कारवाई - बुलडाणा नमाज कारवाई

चिखली शहरामध्ये शुक्रवारी ३ एप्रिलला जुम्माची नमाज अदा करण्याकरिता बारभाई मोहल्लामधील जामा मस्जिद येथे पंधरा ते वीस लोकांनी मस्जिदच्या गेटवर जमा होऊन मस्जिद मध्ये जाण्यासाठी गर्दी केली होती.

buldana namaz actio
बुलडाण्याच्या चिखलीमध्ये शुक्रवारच्या नमाजसाठी गर्दी करणाऱ्यांवर ठाणेदारांची कारवाई
author img

By

Published : Apr 5, 2020, 11:04 AM IST

बुलडाणा - संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोविड १९ हा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ नुसार आजाराच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता बुलडाणा जिल्हादेखील लॉक डाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कलम १४४ नुसार संचारबंदीचे आदेश लागू असून धार्मिक स्थळावर सामूहिक प्रार्थना, पूजा, नमाज पठण इत्यादि कार्यक्रमाकारिता पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

दरम्यान, चिखली शहरामध्ये शुक्रवारी ३ एप्रिलला जुम्माची नमाज अदा करण्याकरिता बारभाई मोहल्लामधील जामा मस्जिद येथे पंधरा ते वीस लोकांनी मस्जिदच्या गेटवर जमा होऊन मस्जिद मध्ये जाण्यासाठी गर्दी केली होती. याबाबत माहिती चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांना मिळाल्यावरून सदर ठिकाणी जाऊन मलिक खान अताउल्लाह खान (३६), शेख नाजीम ठेकेदार (३२), शेख अतहर मास्टर (२७), हाजी रमजानी मिस्त्री (५५), मुजीब महम्मद रूफिक जक्कीवाला (३५), अयाज ठेकेदार रेतिवाले (५५), राजिक खान शफीक खान (३२- अपंग), शेख अमन शेख वजीर (६२), शेख अफरोज शेख रमजानी (३०), शेख गुड्डू शेख रमजानी (२४), जुनैद खान अताउल्लाह खान (३५), हाजी अताउल्लाह खान (६५) सर्व (रा. बारभाई मोहल्ला चिखली) यांच्यावर संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आला आहे. ही कारवाई ठाणेदार पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. किरण खाडे, पो.हे.कॉ. विक्रम काकड, पो.ना. राहुल मेहुनकर, पो.कॉ. पुरूषोत्तम आघाव यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.