ETV Bharat / state

रेशन कार्डावरील धान्य कमी देणाऱ्या दुकानदाराला आमदार भोंडेकरांनी शिकवला धडा - latest bhandara news

नागरिकांच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष माटे, पोलीस पाटील प्रशांत माटे यांच्या माहितीच्या आधारे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना पाचारण करून दुकानावर छापा टाकला. चौकशीअंती तीन दिवसात रेशन दुकानदाराने गरिबांचे १२० किलो तांदूळ व ६३ किलो गहू चोरल्याचे स्पष्ट झाले.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Apr 17, 2020, 3:24 PM IST

भंडारा - गरिबांचे धान्य चोरणाऱ्या शासकीय स्वस्त धान्य दुकानदारावर आमदार भोंडेकर यांच्या पुढाकाराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाकडून गोरगरिबांना नि:शुल्क मिळणाऱ्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या गोसे/बुज. येथील यशवंत वानखेडे या रेशन दुकानदाराला पोलिसांच्या स्वाधीन केले.

गरीब लाभार्थींना प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू निशुल्क वाटपाचे शासन निर्देश असताना हा रेशन दुकानदार प्रत्येक कार्डवर ५ ते १५ किलो धान्य कमी देत होता. अशा असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष माटे, पोलीस पाटील प्रशांत माटे यांच्या माहितीच्या आधारे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना पाचारण करून दुकानावर छापा टाकला. चौकशीअंती तीन दिवसात रेशन दुकानदाराने गरिबांचे १२० किलो तांदूळ व ६३ किलो गहू चोरल्याचे स्पष्ट झाले.

मागील वाटपातील ५ पोती लपवून ठेवलेले धान्यसुध्दा यावेळी जप्त करण्यात आले. गावातील शेकडो नागरिक यावेळी आमदार भोंडेकर यांच्याकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी उपस्थित झाले होते. तहसीलदार गजानन कोक्कडे, अन्न पुरवठा निरीक्षक निमजे, मंडळ निरीक्षक कावठे, तलाठी पोतदार, इंगळे, अड्याळचे पोलीस उपनिरीक्षक मोरे आदींनी ही कारवाई केली. शिवसेनेचे तालुका प्रमुख विजय काटेखाये, उपतालुका प्रमुख प्रशांत भुते, आशिष माटे आदी यावेळी उपस्थित होते. रेशन दुकानदारावर अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल करून चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात गरिबांना उपाशी राहावे लागू नये, म्हणून शासनाने नियमित मिळणाऱ्या धान्यासह 5 किलो प्रतिव्यक्ती ज्यास्त धान्य दिले. मात्र, गरिबांच्या या धान्यावर हा रेशन दुकानदार डल्ला मारत असल्याच्या तक्रारी सतत येत असल्याने मी स्वतः अधिकाऱ्यांना घेऊन इथे आलो. तेव्हा हा दुकानदार मोठ्या प्रमाणात लोकांना धान्य कमी देत होता. याला ताब्यात घेतले आहे आणि या पुढे कोणीही रेशन दुकानदार गरिबांच्या धान्यावर डल्ला मारेल, तर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.