ETV Bharat / state

खुशखबर! भंडारा जिल्ह्यात विवाह सोहळ्यामध्ये 20 लोकांना उपस्थित राहण्याची मिळणार परवानगी - Bhandara district collector news

बुधवारी जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढून भंडारा जिल्ह्यातील काही गावांवर लादलेले प्रतिबंध हटवले आहेत. सदर परिसरातील कोरोनाबाधित महिला पूर्णपणे कोरोना मुक्त झाल्याने या बफरझोनमधील प्रतिबंध हटवण्यात आले आहेत.

bhandara collector
भंडारा जिल्हाधिकारी
author img

By

Published : May 13, 2020, 7:46 PM IST

भंडारा - जिल्ह्यात आता लग्न सोहळे आणि संबंधीत कार्यक्रम पार पाडता येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढला आहे. मात्र, यासाठी पुर्व परवानगीची अट घातली गेली आहे. केवळ 20 लोकांची उपस्थिती आणि शासकीय परवानगी घेऊनच लग्न सोहळे पार पाडता येतील, असा आदेश बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. या आदेशामुळे लॉकडाऊनमुळे तात्पुरते स्थगित केलेली लग्न पार पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा... भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; टिप्पर चालक, मालक फरार

2020 मध्ये लग्नाचे स्वप्न रंगवणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींच्या स्वप्नांवर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पाणी फेरले होते. अनेकांना लग्नाचे बेत पुढे ढकलावे लागले, काहींना लग्नच रद्द करावी लागली होती तर अनेकांनी अगदी चार माणसांच्या उपस्थितीत लग्न आटोपले. एकंदरीत बऱ्याच तरुण तरुणींच्या स्वप्नांचा खोळंबा लॉकडाऊनमुळे झाला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशाने भंडारा जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणींना लग्न करता येणार आहे. यासाठी काही बंधने प्रशासनाने घातली आहेत.

गुरुवारपासून ज्यांना कोणाला लग्न करायचे असेल, त्यांनी यासाठी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांना अर्ज करायचा आहे. तसेच या अर्जात लग्नात 20 पेक्षा जास्त लोक असणार नाही, याची हमी द्यावी लागणार आहे. तसेच सर्व प्रकारची पूर्व परवानगी घेतल्यानंतर लग्न पार पाडता येणार आहे.

कोरोनाबाधित महिला पूर्णपणे बरी झाल्याने बफरझोनमधील गावांवरील प्रतिबंध हटवले...

बुधवारी जिल्हाधिकारी यांनी पुन्हा एक आदेश काढून भंडारा जिल्ह्यातील काही गावांवर लादलेले प्रतिबंध हटवले आहेत. या परिसरातील कोरोनाबाधित महिला पूर्णपणे कोरोना मुक्त झाल्याने सदर बफरझोनमधील प्रतिबंध हटवण्यात आले आहेत. यात तिड्डी, मकरधोकडा, मानेगाव, बोरगाव (बु.) नवेगाव, चोवा, उसरीपार, गराडा (खु.) अर्जुनी जुनी, झाबाडा, टेकेपार (पु.) सिल्ली, दवडीपार, श्रीनगर( पहेला) या गावांचा समावेश आहे. मात्र, कंटेनमेंट क्षेत्रासाठी लागू असलेले प्रतिबंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील, असेही सांगण्यात आले आहेत.

हेही वाचा... लॉकडाऊन:तुमसर नगरपालिकेने शिकवणी वर्ग चालवणाऱ्याला ठोठावला 5 हजारांचा दंड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.