भंडारा - साकोली विधानसभा मतदारसंघ सध्या जिल्ह्यातील सर्वात चर्चचा मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे नाना पटोले हे उमेदवार आहेत. नाना पटोले यांनी भाजपमध्ये खासदार असताना नरेंद्र मोदींवर सडकून टीका करीत भाजपला रामराम ठोकला होता. त्यामुळेच मोदींनी इथे सभा घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या भाषणानंतर तिथे आलेल्या लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी आले होते. साकोली विधानसभा मतदारसंघ सध्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात चर्चचे मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे नाना पटोले हे उमेदवार आहेत. नाना पटोले भाजपमध्ये खासदार असताना नरेंद्र मोदींवर सडकून टीका करीत भाजपला रामराम ठोकला होता. साकोली हा नाना पटोले यांचा गड असल्याने भाजपने साम, दाम, दंड, भेद वापरून नाना पटोले यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मात्र या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाना पटोले यांच्या नावाचा उल्लेखही केला नाही.
हेही वाचा - मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाच जण या, कोणी अडवल्यास माझं नाव सांगा; भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370, हिंदुत्ववाद, राम मंदिर किंवा तीन तलाक या मुद्याविषयी न बोलता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही उपाय योजना असल्याचे सांगितले. भंडारा जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी निर्माण केल्या असल्याचे म्हटले. रखडलेला गोसे धरण पूर्ण केला आहे, असे सांगितले. केंद्रात आणि राज्यात स्थिर सरकार असल्याने आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी बरेच निर्णय घेतले आहेत आणि भविष्यातही असेच निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सातही मतदार संघातील लोकांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी आलेल्या लोकांना केले.
हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'
सभेनंतर तिथे आलेल्या लोकांशी चर्चा केली तेव्हा काहींच्या मते नरेंद्र मोदी यांनी राजकीय भाषण दिले आणि तीच ती रटाळ आश्वासने दिली. गोसे धरण बांधून पूर्ण झाला असला तरी त्याचे पुनर्वसन अजूनही अपूर्ण आहे, असेही लोकांनी सांगितले तर काही लोक नरेंद्र मोदी केलेल्या भाषणाने संतुष्ट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
हेही वाचा - भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; 'म्हाडा'च्या सभापतींचा राजीनामा