ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, आढळला केवळ एक रुग्ण

भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी केवळ भंडारा तालुक्यात एक नवा कोरोग्रस्त रुग्ण आढळला आहे. यामुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचे चित्र दिसत आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 24, 2021, 4:24 AM IST

भंडारा - जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. 23 जूनला केवळ भंडारा तालुक्यात 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर जिल्ह्यात 17 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58 हजार 235 झाली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 59 हजार 446 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण केवळ 00.18

आतापर्यंत 58 हजार 235 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59 हजार 446 झाली असून 86 सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी (दि. 23 जून) कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1 हजार 125 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के आहे. तर पॉझिटिव्ह रेट 00.18 टक्के एवढा आहे. तर जिल्ह्याचा मृत्यूदर 01.89 टक्के एवढा आहे.

भंडारा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

भंडारा जिल्ह्यात 22 जून आणि 23 जून सलग दोन दिवशी केवळ 1-1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर केवळ 86 सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यामुळे हे प्रमाण पाहता येत्या काही दिवसांमध्ये भंडारा जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होईल, अशी आशा प्रशासनातर्फे व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सोळाशे प्रतिदिनवर पोहोचली होती. त्यानंतर रुग्ण संख्या कमी कमी होत आता केवळ एकवर आली आहे. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानकारक आहे. आटोक्यात येत असलेली रुग्णसंख्या पूर्णपणे संपविण्याची असल्यास नागरिकांनी मास्क चा वापर करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आणि सॅनियझरचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा - शेतातील विद्युत मिटर रूममध्ये आढळलेल्या नागिनीसह 20 पिल्लांना जीवदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.