ETV Bharat / state

आजपासून भंडारा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी - Bhandara Corona Update

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज जिल्ह्यात 65 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर 13 मार्चपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मागील 21 दिवसांत 3 लाख 34 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आजपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी
आजपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी
author img

By

Published : Mar 13, 2021, 10:29 PM IST

भंडारा - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज जिल्ह्यात 65 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर 13 मार्चपासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मागील 21 दिवसांत 3 लाख 34 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आजापासून जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी

9 मार्चपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या कमी असली तरी, ही रुग्ण संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. जिल्ह्यात आजपासून रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी असणार आहे.

आज 65 कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात आज 65 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 14258 वर पोहचली असून, यातील 13444 जणांनी कोरोनावर मता केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के एवढे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन

जिल्ह्याती कोरोना रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात आहे, मात्र त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या जर वाढतच राहिली तर नाईलाजाने लॉकडाऊन लावावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, मास्क घालावे, गरज असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन जिल्ह्याधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 3 लाख 34 हजारांचा दंड वसूल

21 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, लग्न समारंभ, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून जिल्ह्यात 3 लाख 34 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक दंड हा मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून वसूल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.