भंडारा- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र करत भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले पुन्हा आक्रमक झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. येत्या 17 तारखेपर्यंत जर पंतप्रधान यांनी शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला नाही तर, स्वतः या लढाईत सहभागी होण्याची तयारी दाखविली आहे.
पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले पत्र-
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा अध्यक्षांनी शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हे त्यांच्या अस्मितेची लढाई नसून अन्नदाता शेतकऱ्याच्या अधिकाराची लढाई आहे. त्यामुळे या आंदोलनाला आपलाही पाठिंबा असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. जर मोदी यांनी हा शेतकरी विरोधी कायदा परत न घेतल्यास आपणही दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराही पटोले यांनी या पत्रात दिला आहे.
शेतकरी आंदोलनावर निर्णय घ्या, अन्यथा मी लढाईत सहभागी होईन; नाना पटोलेंचे पंतप्रधानांना पत्र - Maharashtra assembly speaker on farmers agitation news
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा अध्यक्षांनी शेतकरी विरोधी कायदा मागे घेण्याची विनंती केली आहे.