ETV Bharat / state

भंडाऱ्यात राष्ट्रवादीतर्फे नाना पंचबुद्धे यांनी भरला उमेदवारी अर्ज - काँग्रेस

भंडाऱ्यात राष्ट्रवादीतर्फे नाना पंचबुद्धे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

नाना पंचबुद्धे यांनी भरला उमेदवारी अर्ज
author img

By

Published : Mar 26, 2019, 3:31 PM IST

भंडारा - लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. मात्र, नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज असून खुद्द प्रफुल पटेल यांनी निवडणूक का लढवली नाही? असा प्रश्‍न या कार्यकर्त्यांना पडत आहे. शक्ती प्रदर्शनासाठी काढलेल्या रॅलीतून नाना पंचबुद्धे आणि प्रफुल पटेल यांनी अर्ध्यातच गाडीत बसून निघून गेल्याने शक्ती प्रदर्शन हे नावपूरतेच उरले.

नाना पंचबुद्धे यांनी भरला उमेदवारी अर्ज

रविवारी २४ मार्चला सायंकाळी ६ वाजता भाजपने आपले उमेदवार म्हणून भंडारा-गोंदियासाठी सुनील मेंढे यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यामुळे एनसीपीसुद्धा आज नावाची घोषणा करेल आणि खुद्द प्रफुल पटेल उमेदवार असतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती. दरम्यान, रात्री साडेअकरा वाजता प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीतर्फे माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांच्या नावाची घोषणा केली. परंतु, नाना पंचबुद्दे यांच्या नावाची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागले आहेत.

नाना पंचबुद्धे हे २००४ ते २००९ या कालावधीत भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. शेवटचे ६ महिने ते राज्यमंत्री होते. तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे बहुतेक त्यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दिली गेली असावी. मात्र, नुकतेच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांना एवढी मोठी जबाबदारी मिळेल का ? असा प्रश्न खुद्द कार्यकर्ते विचारत आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एक मोठी शक्तिप्रदर्शनाची रॅली निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र, जलाराम मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना एकत्र करून दुपारी अडीच ते पावणेतीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना तिथेच बसून ठेवले. नंतर नाना पंचबुद्धे तिथे पोहोचले आणि शक्तिप्रदर्शनाच्या रॅलीत न जाता प्रफुल पटेल यांच्यासोबत वेगळ्या गाडीने उशीर झाला म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नाराजीचे सूर उमटले.

नाना पंचबुद्धे यांनी अगोदरच उमेदवारी अर्ज भरून नंतर कार्यकर्ते जमलेल्या सभागृहात पोहोचले. मात्र, तिथूनही उशीर झाला म्हणून प्रफुल पटेलांसोबत एका गाडीत पुन्हा फॉर्म भरायला का निघून गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज काढलेल्या एनसीपीच्या शक्तिप्रदर्शनाच्या रॅलीत नाना पंचबुद्धेंच्या नावाने अजिबात मत मागितले जात नव्हते. हॅलो स्पीकर आणि लोक यावर फक्त प्रफुल पटेल यांना मतदान करा, असेच बोलले जात होते. त्यामुळे प्रफुल पटेल आणि नाना पंचबुद्धे यामध्ये नेमका उमेदवार कोण याबाबात मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

Intro:ANC : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल हेही उपस्थित होते मात्र नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज असून खुद्द प्रफुल पटेल यांनी निवडणूक का लढवली नाही असा प्रश्‍न या कार्यकर्त्यांना पळत आहे. शक्ती प्रदर्शनासाठी काढलेल्या रॅलीतून नाना पंचबुद्धे आणि प्रफुल पटेल यांनी अर्ध्यातून सोडून गाडीत बसून निघून गेल्याने शक्ती प्रदर्शन हे नावपूरतेच उरले.

Body:रविवारी 24 मार्चला सायंकाळी 6:00 वाजेला बीजेपी ने आपले उमेदवार म्हणून भंडारा-गोंदिया साठी सुनील मेंढे यांच्या नावाची घोषणा केली बीजेपीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यामुळे एनसीपी ही आज नावाची घोषणा करेल आणि खुद्द प्रफुल पटेल उमेदवार असतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची असतानाच रात्री साडे अकरा वाजेला प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीतर्फे माजी राज्य मंत्री नाना पंचबुद्धे यांच्या नावाची घोषणा केली. नाना पंचबुद्धे हे 2004 ते 2009 या कालावधीत भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार होते शेवटच्या सहा महिने ते राज्यमंत्री होते तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यामुळे बहुतेक त्यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी दिली गेली असावी मात्र नुकताच त्यांच्या हृदयाचे ऑपरेशन झाले त्यामुळे त्यांना एवढी मोठी जबाबदारी मिळेल का असा प्रश्न खुद्द कार्यकर्ते विचारत आहेत.
नाना पंचबुद्धे च्या नावाची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागले कार्यकर्त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये की प्रफुल पटेल यांनी माघार का घेतली कार्यकर्त्यांना अजूनही विश्वास आहे की प्रफुल पटेल हेच त्यांचे उमेदवार असतील.
उमेदवारी अर्ज भरणे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एक मोठी शक्तिप्रदर्शनाची रॅली निघेल अशी अपेक्षा होती मात्र जलाराम मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना एकत्र करून दुपारी अडीच ते पावणेतीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना तिथेच बसून ठेवले आणि नंतर नाना पंचबुद्धे हे तिथे पोहोचले आणि शक्तिप्रदर्शनाचा रॅलीत न जाता नाना पंचबुद्धे आणि प्रफुल पटेल हे वेगळ्या गाडीने उशीर झाला म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघून गेले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नाराजीचे सूर उमटले.
नाना पंचबुद्धे यांनी रॅली काढण्यात अगोदरच उमेदवारी अर्ज भरून नंतर कार्यकर्ते जमलेल्या सभागृहात पोहोचले मात्र तिथूनही उशीर झाला म्हणून प्रफुल पटेलांवर एका गाडीत पुन्हा फॉर्म भरायला का निघून गेले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज काढलेल्या एनसीपी च्या शक्तिप्रदर्शनाचा रॅलीत नाना पंचबुद्धे च्या नावाने अजिबात मत मागितले जात नव्हते हॅलो स्पीकर आणि लोकं यावर फक्त प्रफुल पटेल यांना मतदान करा असंच बोलले जात असल्यामुळे मतदारांनाही संभ्रम निर्माण झाला आहे की नेमका त्यांचा उमेदवार प्रफुल पटेल आहे की नाना पंचबुद्धे आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.