भंडारा - मागील २५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून जिल्ह्यात पुनरागमन केले. मात्र रोवणीयोग्य पाऊस अजूनही बरसलेला नाही. पुढच्या तीन-चार दिवस पाऊस सुरू राहिला तरच रोवणीला सुरुवात होईल. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झाल्या आहेत. तसेच पऱ्यांच्या (भाताची रोपे) लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भात लावणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता, या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता - rain in bhandara
भंडारा जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झाल्या आहेत. पऱ्यांची (भाताची रोपे) लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भात लावणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता
भंडारा - मागील २५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून जिल्ह्यात पुनरागमन केले. मात्र रोवणीयोग्य पाऊस अजूनही बरसलेला नाही. पुढच्या तीन-चार दिवस पाऊस सुरू राहिला तरच रोवणीला सुरुवात होईल. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झाल्या आहेत. तसेच पऱ्यांच्या (भाताची रोपे) लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Intro:Anc : मागील 25 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून पुनरागमन केलं. मात्र रोवणी योग्य पाऊस अजूनही बरसला नसल्याने पुढच्या तीन-चार दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत राहिला तरच रोवाणीला सुरुवात होईल आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झालेले आहेत. तसेच पऱ्यांची लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली असून 25 दिवसान वरील पऱ्यांची लागवड होण्याची चिन्हे असल्याने या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Body:29 जून पासून भंडारा मध्ये पावसाचे आगमन झाले होते त्याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली मात्र मागच्या 25 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे परे करपले होते. गुरुवारी पावसाचे पुनरागमन झाल्याने पाऱ्यांना एक नवीन जीवनदान मिळालेला आहे.
मात्र असे असले तरी लावणी करण्यासाठी लागणारा पाऊस अजून तरी बरसला नसल्याने पुढच्या चार-पाच दिवस सतत पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला तरच रोवण्या होणे शक्य होतील. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 50 टक्केच पाऊस बसलेला आहे त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे.
पेरणीच्या 20 दिवसांनंतर चे परे हे लावणीसाठी योग्य असतात, या पऱ्यांमुळे उत्पादन चांगला मिळतो. मात्र या वर्षी पावसाने दडी मारल्याने पऱ्यांचे वय वाढले आहे. परे आता 20 ते 25 दिवसांचे झाले आहेत आणि अजूनही रोवणी करण्याइतपत पाऊस बरसला नसल्याने परे तीस दिवसांचे होण्याची शक्यता आहे. ज्यास्त दिवसांचे परे शेतकऱ्यांनी लावू नये असा सल्ला कृषी अधिकार्यांनी दिला आहे, मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता जास्त कालमर्यादेचे परे लावला जाण्याची शक्यता असल्यामुळे या वर्षी उत्पादनात नक्कीच घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बाईट : अनिल कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा
Conclusion: