ETV Bharat / state

कोरोनाबद्दल केंद्र शासनाची केवळ जुमलेबाजी, सुनील केदार यांचा निशाणा - भंडारा न्यूज

कोरोनाबद्दल केंद्र शासन केवळ जुमलेबाजी करत आहे. वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव ठेवून जनतेला उपयोगी पडेल असे धोरण निश्चित केले पाहिजे. असे मत दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

minister Sunil kedar
सुनील केदार यांचा केंद्र सरकारवर निशाणा
author img

By

Published : Apr 4, 2020, 6:02 PM IST

भंडारा - कोरोनाबद्दल केंद्र शासन केवळ जुमलेबाजी करत आहे. वस्तुस्थिती काय आहे याची जाणीव ठेवून जनतेला उपयोगी पडेल असे धोरण निश्चित केले पाहिजे. असे मत दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. ते आज भंडारा येथील दुग्ध भुकटी प्रकल्प पाहणीसाठी आले होते. त्यावेळी बोलत होते.

सुनील केदार यांचा केंद्र सरकारवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला 9 वाजता 9 मिनटांसाठी लोकांनी घरातील लाईट बंद करून पूर्णपणे अंधार करावा आणि मोबाईलचा टॉर्च किंवा दिवा लावावा असे आवाहन केले आहे. याविषयी सुनील केदार यांना विचारले असता, ते म्हणाले की, ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे याचा कोरोनाशी काय संबंध आहे हे त्यांनीच जनतेला सांगावे. कोरोना झाल्यानंतर काय उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल केंद्र शासनाचे संपूर्ण धोरण अजूनही निश्चित नाही. नागपूर आणि वर्ध्यात दोन खासगी लॅब आहेत. जे कोरोना विषाणूची तपासणी करून अहवाल देऊ शकतात. मात्र, मागील 12 दिवसांपासून अजूनही मंजुरी देण्यात आली नाही.

सुनील केदार यांचा केंद्र सरकारवर निशाणा

लोकांना 5 किलो धान्य मोफत देऊ अशी घोषणा केली असली, तरी त्याची नियमावली अजूनही पाठविली नाही. हे धान्य कुठून द्यावे, कोणी द्यावे, कोणत्या योजनेतून द्यावे याचे काहीच सोयरसुचक नाही. केवळ जुमलेबाजी सुरू आहे. जुमलेबाजी करण्याचा हा प्रकार बंद करून आजची वस्तुस्थिती काय आहे त्या अनुषंगाने विचार करावा असे आवाहन केदार यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.