ETV Bharat / state

भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर; 'म्हाडा'च्या सभापतींचा राजीनामा

भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आले असून, मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून भाजपचा मुस्लीम चेहरा असलेले विद्यमान म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांनी अचानक गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपचा मुस्लीम चेहरा असलेले विद्यमान म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांनी अचानक गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे.
author img

By

Published : Oct 11, 2019, 3:32 PM IST

भंडारा - भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आले असून, मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून भाजपचा मुस्लीम चेहरा असलेले विद्यमान म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांनी अचानक गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी भाजपच्या प्राथमिक सभासत्वाचा राजीनामा दिल्याने सध्या पक्षांतर्गत चर्चांना तोंड फुटले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे तारिक कुरेशी यांना राजीनामा परत घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी सांगितले.

भाजपचा मुस्लीम चेहरा असलेले विद्यमान म्हाडा सभापती तारिक कुरेशी यांनी अचानक गुरुवारी पदाचा राजीनामा दिला आहे.

पालकमंत्री परिणय फुके यांना जिल्ह्याची जबाबदारी सोपवल्यानंतर भाजपमध्ये तुमसर विधानसभा मतदारसंघात गटबाजीचे वातावरण आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणात वादळ निर्माण झाले आहे.

आमदार वाघमारे यांची पक्षाने 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. तारिक कुरेशी हे त्यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावरही याप्रकारचे आरोप होत आहेत. तसेच त्यांना मिळणारी वागणूक योग्य नसल्याचे सांगत कुरेशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कुरेशी हे जिल्ह्याचे मोठे नेते असून, त्यांनी कोणत्या कारणास्तव राजीनामा दिला हे माहित नसल्याचे भाजप उमेदवार प्रदीप पडोळे यांनी सांगितले. तसेच त्यांना राजीनामा परत घेण्याची विनंती केल्यास ते आमच्या शब्दाचा मान ठेवतील असा विश्वास पडोळे यांनी व्यक्त केला.

एका निस्वार्थ सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रासून राजीनामा द्यावा लागतो, हे भाजपचे मोठे अपयश आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे बंडखोर नेते चरण वाघमारे यांनी दिली.

Intro:ANC : भंडारा जिल्ह्यातील भाजपाचे अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आले मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून भाजपाचा मुस्लिम चेहरा असलेले माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान म्हाडा सभापती तारीक कुरेशी यांनी अचानक गुरुवारी आपल्या पदाचा आणि भाजपच्या प्राथमिक सभासत्वाचा राजीनामा दिल्याने भाजपा मध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे, ऐन निवडणुकीच्या काळात भाजपा साठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे राजीनामा परत घेण्यासाठी विनंती करू असे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी सांगितले.

Body:मागील काही दिवसापासून भंडारा जिल्ह्यातील भाजपाच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे पालकमंत्री परिणय फुके यांना भंडारा ची जबाबदारी सोपविल्या नंतर भाजपामध्ये विशेष करून तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये दोन गट निर्माण झाले जिल्ह्याध्यक्ष आणि विद्यमान आमदार यांच्यात हे वाद सुरू झाले त्यातच जिलाध्यक्षाच्या बाजूने पालकमंत्री आणि खासदार असल्याने आमदार हे एकटे पडले.
त्यानंतर विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले पालकमंत्री यांनी षडयंत्र रचून हे गुन्हे माझ्यावर लावले असा आरोपही आमदार चरण वाघमारे यांनी केला.
आमदार चरण वाघमारे यांनी पक्षाने तिकीट कापून भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदिप पडोळे यांनी तिकीट दिल्याने आमदार वाघमारे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूकित उभे राहिल्याने त्याना पक्षाने 6 वर्षासाठी पक्षातून हक्कलपटी केली याच चरण वागजमरे यांच्या बाजूने म्हाडा सभापती तारिक कुरेशी हे अश्याच आरोप त्यांच्यावर होत असल्याने त्याना दिली जाणारी वागणूक योग्य नसल्याचे सांगत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला निवडणुकीचा वेळेत त्यानी तडकाफडकी दिलेला राजीनामा हा भाजपा साठी मोठा धक्का आहे. या मुळे कुरेशी यांच्यासह पार्टीत जडलेल्या मुस्लिम मतांचा ही तोटा होऊ शकतो.
तारिक कुरेशी मागील कित्येक वर्ष्यात बऱ्याच मोठ्या भूमिका त्यांना पक्षसाठी बजावल्या आहेत मात्र अंतर्गत गटबाजीमुळे एक निष्टवंत मुस्लिम कार्यकर्त्याचा राजकीय बळी घेतल्या गेला.
तारीक कुरेशी हे आमचे आदर्श आहे या जिल्ह्याचे मोठे नेते आहेत त्यानी कोणत्या कारणास्तव राजीनामा दिला हे माहीत नाही मात्र त्यांना राजीनामा परत घेण्याची विनंती करू आणि ते घेतील असा विश्वास आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष आणि तुमसर विधानसभा भाजपा उमेदवार प्रदीप पडोळे यांनी सांगितले.
एका निस्वार्थ सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला राज्यमंत्रीचा दर्जा असलेल्या व्यक्तीला त्रासून राजीनामा द्यावा लागतो हे भाजपचे मोठे अपयश आहे अशी प्रतिक्रिया भाजपा चे बंडखोर आमदार चरण वाघमारे यांनी दिली.
चरण वाघमारे, विद्यमान आमदार आणि बंडखोर अपक्ष उमेदवार, तुमसर विधानसभा क्षेत्र

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.