ETV Bharat / state

भंडारा शहरातील बाजारपेठ सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद होणार

author img

By

Published : Mar 21, 2021, 10:21 PM IST

भंडारा शहरात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळेच भंडारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी 22 मार्चपासून भंडारा शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहण्याचे नवे आदेश काढले आहेत. मात्र, दवाखाने आणि औषधे दुकानांवर वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही.

भंडारा
भंडारा

भंडारा - जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेषता भंडारा शहरात रुग्णांचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळेच भंडारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी 22 मार्चपासून भंडारा शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहण्याचे नवे आदेश काढले आहेत. मात्र, दवाखाने आणि औषधे दुकानांवर वेळेचे कोणतेही बंधन राहणार नाही.

रविवारी भंडारा जिल्ह्यात 123 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 61 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज आलेल्या 123 रुग्णांपैकी भंडारा तालुक्यातील 50, मोहाडी 5, तुमसर 10, पवनी 28, लाखणी 20, साकोली 8 तर लाखांदूर तालुक्यात 2 व्यक्तींचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यात अलिकडेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भंडारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी भंडारा शहरातील दुकाने व आस्थापनांच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते रविवार दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकानाची नवीन वेळ राहणार आहे.

कोणते दुकाने किती वेळेस सुरू राहतील

नवीन निर्णयानुसार मंगळवार वगळता सोमवार ते रविवार सर्वच दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेअंतर्गत खानावळ व हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने, भाजीपाला, फळविक्रेता, दूध डेरी, चष्मा दुकाने, सुपर शोपी, गॅरेज, कृषीविषयक सर्व दुकाने, हार्डवेअर, इमारत साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, स्वीट मार्ट, कापड दुकान, ज्वेलरी, स्टेशनरी व इतर सर्व प्रकारची दुकाने यांचा समावेश आहे. दवाखाना व औषधे दुकाने यांना वेळेचे बंधन राहणार नाही तसेच हे सोमवार ते रविवार सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने मंगळवारी बंद राहणार आहेत.

दुकानांसमोर सहा फुटाचे मार्किंग आवश्यक

सोमवारपासून सुरू होणार्‍या नवीन नियमांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यासाठी प्रत्येक दुकानासमोर सहा फुटाचे मार्किंग करणे आता आवश्यक करण्यात आले आहे. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक दुकानाच्या समोर मार्किंग करण्यात आले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि सर्वांचेच दुर्लक्ष झाले. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दुकानासमोर मार्किंग करणे आवश्यक झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.