ETV Bharat / state

Look Back 2022 : 2022 मधील भंडारा जिल्ह्यातील घडामोडीवर एक नजर

भंडारा जिल्ह्यासाठी 2022 वर्ष काही चांगल्या काही वाईट गोष्टीचा अनुभव देणारे वर्ष ठरले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका, ( Gram Panchayat Election Bhandara ) जिल्हा परिषद निवडणुका ( Zilla Parishad Election Bhandara ) तसेच राजकीय प्रशासकीय घडमोडी घडल्या आहेत.

Development work organized by Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकास कामाचे आयोजन
author img

By

Published : Dec 28, 2022, 9:12 PM IST

Updated : Jan 1, 2023, 7:20 AM IST

भंडारा - वर्ष 2022 संपत आलेले आहे. हे संपूर्ण वर्ष म्हणजे भंडारा जिल्ह्यासाठी चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देणारा वर्ष ठरलेला आहे. जिल्हा परिषद निवडणूक, ( Zilla Parishad Election Bhandara ) ग्रामपंचायत निवडणुका ( Gram Panchayat Election Bhandara ) यासह काही राजकीय, प्रशासकीय घडामोडी घडलेल्या आहेत. तसेच काही घृणास्पद घटनाही या काळात घडलेल्या आहेत. तर वर्षाच्या शेवटी शेवटी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून काही विकासात्मक गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत. नेमकं काय काय घडलं या वर्षभरात चाला जाणुन घेऊया.

वर्षाच्या सुरवातीला आमदार गेले तुरुंगात - 2022 ची सकाळ ही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी ठरली. 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी तालुक्यावरून तुमसरला जात असताना मोहाडी पोलीस, तुमसर येथील दोन व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या दोन व्यापाऱ्यांना चांगलीच मारहाण केली. ही माहिती मिळताच तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे ( MLA Raju Karemore ) यांनी मोहाडी पोलीस स्टेशन ( Mohadi Police Station ) गाठले. सर्वसामान्य लोकांना एवढ्या बेदम पणे का मारहाण करता यावरून पोलिसांना चांगलेच खडे बोल सुनविले. एवढेच नाही तर, बोलताना आमदारांनी अगदी कमरेखालच्या शिव्या दिल्या त्यादरम्यान पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित होत्या. आमदार देत असलेल्या शिव्यांचा व्हिडिओ एक जानेवारीच्या सकाळी लोकांच्या मोबाईल पर्यंत पोहचून एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांच्या विरुद्ध नंतर गुन्हा दाखल केला. 3 जानेवारीला त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, त्याच दिवशी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयातून जामीनही मिळाला.

जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसला भाजपाची साथ - भंडारा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून दिड वर्ष लोटले होते. मात्र, कोरोणामुळे निवडणुका झाल्या नाहीत. 18 डिसेंबर 2021, 19 जानेवारी 2022 अशा दोन टप्प्यात भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. 21 जानेवारी 2022 ला निवडणुकीचा निकाल लागला. या निकालामध्ये 52 पैकी काँग्रेसला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 13, ( Congress ) भाजपला 12, शिवसेना एक, वंचित एक, बसपा एक, अपक्ष तीन लोक निवडून आले होते. या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येत सत्ता स्थापन करतील अशी अपेक्षा जिल्ह्यातील सर्वांनाच होती. मात्र, राजकीय खलबते सुरू झाले. भाजपाचे 12 पैकी 6 लोकं फुटीरवादी झालेत. या प्रकरणानंतर नेमकी सत्ता कोणाची? भाजपाचे फुटीरवादी सहा लोक हे काँग्रेसशी हात मिळवणी करतील की राष्ट्रवादीशी? या सगळ्या चर्चा शेवटपर्यंत सुरू राहिल्या. शेवटी भाजपाचे सहा फुटीरवादी उमेदवारांनी काँग्रेस सोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, तर फुटीरवादी गटातून आलेले संदीप ताले हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालेत.

उपविभागीय अधिकाऱ्यांवर वाळू माफियांचा हल्ला - भंडारा जिल्ह्यातील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने जिल्ह्यातून वाळू तस्करांची संख्या मोठी आहे. वाळू माफिया आता एवढे निडर झाले आहेत की, एका प्रशासकीय अधिकाऱ्यांवर त्यांनी हल्ला केला. 27 एप्रिलच्या पहाटे भंडारा उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे पवनी तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कार्यवाहीसाठी गेले. मात्र, त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सोबत घेतलेली नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत जवळपास 20 ते 30 वाळूमाफियांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याची सूचना पवनी पोलीस स्टेशनमध्ये मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने त्या रात्री राठोड यांचा जीव वाचला. त्यानंतर हल्ल्यातील बऱ्याच लोकांना अटकही करण्यात आली. मात्र, हल्ल्याचा मास्टरमाईडला शेवटपर्यंत अटक केली गेली नाही. एवढेच नाही तर त्याला आता जामीन मिळाल्यामुळे त्याला पोलीस अटक करणार नाहीत. या सर्व प्रकरणानंतर वाळू माफियांच्या मुसक्या खरच आवरता येणे अशक्य आहे का? प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्यांना पाठीशी घालताय का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

पूर परिस्थिती निर्माण - 2020 मध्ये भंडारा जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला होता. 2022 मध्ये पुन्हा भंडारा जिल्ह्याला पुराचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात शेती, घरांचे नुकसान हे झाले. मात्र 2020 चा अनुभव जिल्हा अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याने 2022 होणारे नुकसान कमी करण्यात प्रशासनाला यश नक्की आले असं म्हणता येईल.

महिलेवर अमानुष अत्याचार - गोंदिया जिल्ह्याच्या एका महिलेवर लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत अतिशय अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. अत्याचारानंतर विवस्त्र पडलेल्या महिलेला स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादून गेला. त्या महिलेची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने तिला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून स्पेशल पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करून तपास सुरू केला. या प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटकही करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे 2022 मध्ये जिल्ह्यासाठी एक काळीमा फासणारी घटना होती.

शेतकरी बोनस पासून वंचित - भंडारा जिल्हा हा तांदूळ शेतीसाठी प्रसिद्ध आहे. जवळपास एक लाख 75 हजार हेक्टरवर धान्याची शेती केली जाते. या शेतकऱ्यांचे धान दरवर्षी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शासनाने निर्धारित केलेल्या किमतीत खरेदी केली जाते. त्यासोबत या शेतकऱ्यांना बोनस सुद्धा दरवर्षी मिळत असतो. मात्र, यावर्षी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप तरी बोनस मिळाला नाही. त्याची साधी घोषणाही झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हत्तींचे आगमन - भंडारा जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हत्तींचे आगमन 2022 मध्ये झाले. 21 हत्तींचा हा कळप भंडारा जिल्ह्यात पंधरा दिवस तळ ठोकून होता. या कालावधीत या हत्तींच्या कळपाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यांच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन्यप्रेमीच्या दृष्टीने हत्तींचे आगमन हे पर्यावरणासाठी पोषक असल्याने वन्यप्रेमी आनंदी होते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली - राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याबरोबर भंडारा जिल्ह्यातही त्याचा प्रभाव पाहायला मिळाला. सर्वात पहिले भंडारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांना बदलीचे स्थान निश्चित करण्यात आले नाही. त्यानंतर हिमाचल प्रदेश वरून प्रतिनियुक्ती घेऊन आलेले जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कोरोना, पूर परिस्थिती मोठ्या शिताफीने हातळली होती. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचे दार सतत सुरू राहत असत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्या दोन वर्षाचा कालावधी संपल्याच्या दिवशीच रात्रीला त्यांचा बदलीचा आदेश काढण्यात आला. अशा पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जाणीवपूर्वक केलेल्या बदल्या या नागरिकांना मुळातच रुचल्या नसल्या तरी, राजकीय लोकांनी वैमण्यासातून त्यांचा हेतू मात्र साध्य केला आहे, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होती.

324 ग्रामपंचायत निवडणुका - यावर्षी भंडारा जिल्ह्यात 324 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. पहिल्या टप्प्यामध्ये 19 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर डिसेंबर महिन्यात 305 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. 305 ठिकाणी थेट नागरिकांमधून सरपंच निवडून द्यायचे असल्याने या निवडणुका मोठा रंगतदार ठरल्या. या निवडणुकांच्या निकालानंतर सर्वच पक्षांनी दावे प्रतिदावे केले असले तरी 124 ठिकाणी निवडून येत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

मुख्यमंत्र्यांचे आगमन ठरले जिल्ह्यासाठी फायद्याचे - मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भंडारामध्ये आगमन झाले. विविध विकास कामाचे त्यांनी भूमिपूजन केले. तसेच 900 कोटीची विकास निधी जिल्ह्यासाठी मंजूर केली. यामध्ये गोसे प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर जल पर्यटन निर्मितीच्या दृष्टीने 432 कोटी मंजूर करण्यात आले. या जल पर्यटनामुळे जिल्हाची एक वेगळी ओळख निर्माण होईल तसेच जिल्ह्यातील लोकांना यामुळे रोजगारांच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.

आशियातील सर्वाधिक मोठे पूल जिल्ह्यात - राष्ट्रीय महामार्ग सहावर बनविण्यात आलेल्या साकोली, लाखनी तालुक्यातील आशियातील सर्वात मोठे पूल यावर्षी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करून नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. सर्वाधिक लांब, रुंद असलेले हे पूल वाहतुकीसाठी एक नवे वरदान ठरणार आहे.

Last Updated : Jan 1, 2023, 7:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.