ETV Bharat / state

भंडाऱ्यातील लाखनी पोलिसांनी पकडला 4 लाखांचा गांजा; चौघांना अटक

छत्तीसगड राज्यातून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या चौैघांना अटक करण्यात आली आहे. लाखनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चौघांना अटक
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:34 PM IST

भंडारा - छत्तीसगडवरून आणलेला ४ लाख किमतीचा चाळीस किलो गांजा लाखनी पोलिसांनी पकडला आहे. या प्रकरणात ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन दुचाकीसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

लाखनी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल निराळे यांनी लाखनी पोलीस स्टेशनसमोर नाकाबंदी केली. छत्तीसगड राज्यातून विनानंबरच्या दोन दुचाकी येताना दिसल्या. या दुचाकींना थांबवून त्यावर बसलेल्या व्यक्तींची व मोटरसायकलची झडती घेतली. तर त्यामध्ये अंदाजे चाळीस किलो अमली पदार्थ गांजा पोलिसांच्या हाती लागला. या गांजाची अंदाजे किंमत चार लाख रुपये आहे. तसचे दोन मोटरसायकल पकडून असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या चारही आरोपींवर 164/ 2019 कलम 22 (ब) 22 एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.

Intro:Body:Anc : लाखनी पोलिसांनी छत्तीसगड वरून आणलेला चार लाख किमतीचा चाळीस किलो गांजा पकडला आहे.या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून दोन दुचाकीसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

लाखनी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल निराळे यांनी लाखनी पोलिस स्टेशन समोर नाकाबंदी करून सापळा रचून छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या विना नंबरच्या दोन दुचाकी यामध्ये एक डिस्कवर व एक सीडी १०० या वाहनांना थांबवून त्यावर बसलेल्या इसमांची व मोटरसायकलची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील अंदाजे चाळीस किलो अमली पदार्थ गांजा ज्याची अंदाजे किंमत चार लाख रुपये व दोन मोटरसायकल किंमत एक लाख रुपये असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल मिळविला आहे. या चारही लोकांवर 164/ 2019 कलम 22(ब)22 NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.