नागपुर - सामूहिक बलात्कार पिडीतेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये, अशा सूचना रुग्णालय प्रशासन, पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या, असा आरोप शिवसेना नेत्या तथा प्रवक्ता मनीषा कायंदे ( Manisha Kayande ) यांनी केला आहे. भंडारा गोंदिया येथील सामूहिक बलात्कार पीडितेला भेटण्यासाठी नागपूरात आल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत ही शिवसेनेकडून दिली जाणार होती पण ती सुद्धा घेऊ नये अशा सूचना दिल्याचा आरोप त्यांनी केला.
पीडितेला मदत करू दिली नाही - यात बलात्काराच्या पीडित महिलेला भेटण्यासाठी नागपूरच्या शासकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील वार्डात पोहचलो. पण त्या ठिकाणी पोलिसांनी एकावेळी एकच व्यक्ती जाईल अशी अट घातली. तसेच कुटुंबियांना विचारपूस केल्यास कुठलिही माहिती त्याना देऊ नयेत अशा सूचना दिल्या होत्या अशी शंका कायंदे यांनी उपस्थित केलीत. त्यांनी अखेर एकावेळी एकच जण वार्डात जाऊन मनीषा कायंदे यांनी पिडीतेसह तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेने तर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचा होता. ती सुद्धा आम्हाला पिडीतेच्या कुटुंबियांना देऊ दिली नाही. त्यानंतर मनीषा कायंदे यांनी पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांचीही त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेत तपासा संदर्भात माहिती घेतली.
तपासात दिरंगाई - भंडारा जिल्ह्यात सहा दिवस पोलीस अधीक्षक नव्हते. आधीचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना शिंदे गटाचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर ( MLA Narendra Bhondekar ) यांच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी तिथून हटवले होते. नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक होण्याच्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली. कदाचित पोलीस अधीक्षक राहिले असते तर, ही घटना अशा वळणावर गेली नसती, घटनेच्या तपासात दिरंगाई झाली नसती असेही आमदार तथा शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणल्यात.
हेही वाचा - तेलंगणा: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या नावावर पिता-पुत्राने केली 16 कोटी रुपयांची फसवणूक
200 पोलीस कर्मचाऱ्याचे 12 पथक घेत आहे आरोपीचा शोध .. यात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटने संदर्भात पोलिसांनी पहिल्याच दिवशी दोन आरोपींना अटक केली होती. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याला शोधण्यासाठी 12 पथक तयार केले असून 200 पोलीस कर्मचारी तपास करत असल्याची माहिती पोलीस महानिरीक्ष संदीप पाटील यांनी दिली. या घटनेतील पिडीते सोबत तिची वैद्यकीय अवस्था पूर्णपणे बरी नसल्यामुळे पोलिसांना अद्याप जवाब नोंदवता आला नाही. या प्रकरणाच्या तपासात आणखी आरोपींचा सहभाग समोर आल्यास त्यांनाही अटक केली जाईल. त्यामुळे यात आरोपींची संख्या वाढू शकते असे संकेत पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
यावेळी मनीषा कायंदे यांच्यासोबत सुषमा अंधारे यासुद्धा उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पीडितेला मनोधैर्य योजनेतून पीडितेला त्वरित मदत देणे अपेक्षित होती. ती दिली ननसल्याचं आरोप करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ स्थापन न झाल्याने दिरंगाई होत असल्याचा आरोप केलात.