भंडारा - जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील विदर्भ महाविद्यालयाचे संस्थाचालक व त्याच महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याने महाविद्यालयात कार्यरत असलेल्या परिचराला बंदुकीने गोळी मारल्याची गंभीर घटना आज घडली आहे. जखमीवर नागपूर येथे उपचार सुरू असून संस्था चालकास पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष गोपाल आगाशे असे गंभीर पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
विदर्भ महाविद्यालयातील घटना -
संस्थाचालक असलेल्या अमित हुकुमचंद गायधनी हे नवशक्ती पीठ शिक्षण संस्था मुरमाडी/सावरी मध्ये सहसचिव असून या संस्थेंतर्गत असलेल्या लाखनी येथील विदर्भ महाविद्यालय भूगोल विभागप्रमुख म्हणून नोकरी करतो. भाजप पक्षामध्ये उच्चपदस्थ पदाधिकारी म्हणून काम करतो. आपल्या याच राजकीय पक्षाचा व मोठ्या ओळखीचा फायदा घेत महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांशी नेहमी अरेरावीची भाषा केली जात असल्याची चर्चा आहे. आजही सदर संस्थाचालकाने कर्तव्यावर कार्यरत असलेले परिचर सुभाष आगाशे यांच्याशी अतिशय खालचा भाषण भांडण सुरू केले. प्रत्येक वेळेस सर्वांसमोर घालून पाडून बोलत असल्यामुळे यांनीसुद्धा संस्थाचालकांना उत्तर दिले त्यामुळे संतापलेल्या संस्थाचालक हुकुमचंद गायधनी यांनी आगाशे यांच्यावर एअर गनने गोळ्या झाडल्या. यामध्ये परिचराच्या छातीजवळ गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर संपूर्ण महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
उपचारासाठी नागपूरला हलविले -
बंदुकीचा आवाज येताच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी घटनास्थळी धावले त्यांनी आगाशे याला तातडीने उचलून उपचारासाठी प्रथम लाखनी येथे दाखल केले. त्यानंतर आगाशे यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारसाठी भरती करण्यात आले आहे.
संस्था चालकाला अटक -
जखमी आगाशे यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संस्था चालक गायधनी याला लाखनी पोलिसांनी भंडाऱ्यात अटक केली आहे.
लाखनी येथे संस्थाचालकाचा महाविद्यालयतच शिपायाचा गोळीबार, प्रकृती गंभीर
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील विदर्भ महाविद्यालयाचे संस्थाचालक व त्याच महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याने महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिपायाला बंदुकीने गोळी मारल्याची गंभीर घटना आज घडली आहे.