भंडारा - कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यातही 16 जानेवारी 2019 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 14,072 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याची टक्केवारी 90 टक्के एवढी आहे. तर 1 मार्च पासून ज्येष्ठ नागरिकांनी साठी कोरोना लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत 1998 ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.
मात्र ज्या ज्येष्ठ नागरिकांनी को
रोनाच्या ॲपमध्ये ऑनलाईन नोंदणी केली. त्यांना अजूनही त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याने आणि लसीकरणाची तारीख मिळाली नसल्याने लसीकरण्यासाठी अजूनही जात नसल्याचे समोर येत आहे. यावर उपाय म्हणून लसीकरण केंद्रात दुपारी साडेबारा पर्यंत ज्येष्ठ नागरिक पोहोचल्यास त्यांची तिथेच नोंदणी केली जाते आणि त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना लस दिली जात आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली आणि त्यांना अजूनही लसीकरणासाठी तारीख मिळाली नाही. अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांनीही लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लगेच लस घ्यावी, अशी विनंती डॉक्टर करीत आहेत.
जिल्ह्यातील सातही तालुक्यात सुरू आहे लसीकरण-
16 जानेवारीपासून सुरू झालेले हे लसीकरण भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय भंडारा, तुमसर उपजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय साकोली, ग्रामीण रुग्णालय लाखणी, ग्रामीण रुग्णालय पवनी, ग्रामीण रुग्णालय मोहाडी व ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे सुरू आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर मिळून भंडारा जिल्ह्यात पंधरा हजार 170 कर्मचारी आहेत. यामध्ये आठ हजार 349 आरोग्य कर्मचारी व सहा हजार 821 फ्रन्टलाइन वर्करचा समावेश आहे. आतापर्यंत 7055 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून दुसरा डोस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन हजार 198 आहे. तर पाच हजार 214 फ्रन्टलाइन वर्करने लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. लसीकरणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून लस घेतल्यानंतर त्रास होण्याच्या तक्रारी शुन्य प्रमाणात आहेत.
खासगी रुग्णालयात अजूनही लसीकरण नाही-
शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा लसीकरण होणार होते. यासाठी खासगी रुग्णालयांनी सर्व शर्तींची पूर्तता केली आहे. यामध्ये पेस हॉस्पिटल भंडारा, इंद्राक्षी हॉस्पिटल भंडारा, पार्वती हॉस्पिटल साकोली या रुग्णालयांचा समावेश आहे. मात्र अद्याप तरी या रुग्णालयांमध्ये लसींचा पुरवठा झाला नसल्याने तिथे लसीकरण सध्यातरी सुरू झालेले नाही.
हेही वाचा- भाईंदर पूर्वेमधील गॅस गळती आटोक्यात