भंडारा - पक्षी आणि इतर प्राण्यांची जीवितहानी रोकण्यासाठी न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. यंदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने बंदी असतानादेखील पंतंग उडवण्यासाठी जिल्ह्यात सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री झाल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा - राजस्थान : चिनी मांजाने गळा कापल्यानं चार वर्षीय बालकाचा मृत्यू
नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे वन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, नायलॉन मांजा विक्री होऊनही जिल्ह्यात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानासमोर 'इथे नायलॉन मांजा मिळत नाही', असे बोर्ड लावले होते. मात्र प्रत्यक्षात ते नायलॉन मांजा विकत होते. तरीही, न्यायालयाचा आदेश झुगारणाऱ्या विक्रेत्यांवर कुठलीही कारवाई झालेली नाही.