ETV Bharat / state

खळबळजनक : पत्नीचा मोबईल घेणे पडले महागात; पत्नीने कापले पतीचे ओठ - ETV bharat maharashtra

भंडारा जिह्यातील मासळ येथे खळबळ उडवणारी घटना घडली आहे. मोबाईलच्या नादात आणि मोबाईलसाठी कोण काय करेल याचा आपण विचारही करू शकत नाहीत. एका पत्नीने मोबाईलसाठी आपल्या पतीचे ओठ कापल्याची घटना येथे घडली आहे.

Husband's cut lips for mobile in bhandara
खळबळजनक : मोबाईलसाठी पत्नीने कापले पतीचे ओठ
author img

By

Published : Oct 16, 2021, 2:49 PM IST

Updated : Oct 16, 2021, 3:24 PM IST

भंडारा - जिह्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. मोबाईलच्या नादात आणि मोबाईलसाठी कोण काय करेल याचा आपण विचारही करू शकत नाहीत. अशीच एक थरकाप उडवणारी घटना ही जिल्हातील मासळ येथे घडली आहे. एका पत्नीने मोबाईलसाठी आपल्या पतीचे ओठ कापल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी पत्नीविरूद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मासळ येथील खेमराज बाबुराव मुल (40) यांचा मोबाईल हा नादुरूस्त झाला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल वापरण्यासाठी घेतला. परंतु, दोन दिवस उलटून सुद्धा पतीने आपला मोबाईल परत न दिल्याने त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी भांडणात रागावलेल्या पत्नीने घरातील विळा खेमराज यांना फेकून मारला. त्यामध्ये विळा यांच्या तोंडाला लागून त्यांचे ओठ कापल्या गेले. जखमी अवस्थेत खेमराज यांना लाखांदूर येथील ग्रामीम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खेमराज यांनी आपल्या पत्नीविरूद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात : अंबिया बहारातील संत्रा बागांना गळती; भावही कोसळले

Last Updated : Oct 16, 2021, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.