भंडारा - जिल्ह्यातील कारधा गावात घरगुती भांडणातून पती-पत्नीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून ( Death by Pouring Kerosene on the Body ) घेतल्याची घटना घडली आहे. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू ( Husband Wife Death in Bhandar ) झाला. शनिवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने 3 वर्षीय मुलगा बचावला आहे.
कौटुंबिक वादानंतर ओतले रॉकेल -
महेंद्र सिंगाडे यांचे तीने वर्षाआधी मेघा हिच्याशी विवाह झाला. महेंद्र हा टेकेपार डोडमाझरी येथील ग्रामपंचायतमध्ये कंत्राटी ऑपरेटर म्हणून कामावर होता. लग्नानंतर सुरुवातीला सुखी संसार सुरू होता. मात्र कालांतराने पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. त्यामुळे महेंद्र हा दारूच्या आहारी गेला. घरी दररोज भांडण सुरू झाले. शनिवारी रात्री महेंद्र आणि मेघा यांच्यात पुन्हा भांडण सुरु झाले. नेहमीच भांडण होत असल्याने शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. भांडण सुरू असताना घरातील दार आतून बंद होते. त्यामुळे कोणीही घरात डोकावून बघितलं नाही. मात्र नऊच्या दरम्यान दोघांच्याही किंचाळण्याचा आवाज यायला लागला. शिवाय घरातून धूर निघायला लागला. त्याच्या भावाने महेंद्र यांच्या घराचा दरवाजा तोडला दोघेही जळतांना दिसले. त्यानंतर महेंद्र आणि त्याची पत्नी दोघेही घराबाहेर आले आणि दारासमोर येऊन पडले.
तीन वर्षाचा मुलगा बचावला -
महेंद्र आणि मेघा या आगीत पूर्णपणे भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत घरी असलेला त्यांचा तीन वर्षाचा मुलगा मात्र सुदैवाने बचावला गेला. घटनेनंतर त्याची माहिती पोलीस विभागाला देण्यात आली. तसेच दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून घटनेची नोंद कारधा पोलीस स्टेशनला केली आहे. पोलीस अधिक तपास करित आहे.