ETV Bharat / state

भंडारा ग्रीनमधून लवकरच ऑरेंज झोनमध्ये जाण्यास तयार..! नागपुरातील हॉटस्पॉट भागातील दाम्पत्य जिल्ह्यात दाखल

जिल्ह्यात अजूनही एकही रुग्ण नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्हा बंदी असूनही रेड झोन ( नागपूर) मधील लोक सहज भंडारा जिल्ह्यात येत असल्याचे पुढे येत आहे. बुधवारी तर नागपुरातील सर्वात हॉट स्पॉट असलेल्या मोमीनपुरा येथून पती-पत्नी आणि त्यांचा एक मुलगा दुचाकीने भंडारात दाखल झाले. यामुळे लवकरच भंडारा जिल्हा सुद्धा ऑरेंज किंवा रेड झोन मध्ये येण्यास तयार आहे. हे म्हणायची वेळ आली आहे.

Nagpur couple entered  in bhandara district
नागपुरातील हॉटस्पॉट भागातील दाम्पत्य भंडारा जिल्ह्यात दाखल
author img

By

Published : Apr 17, 2020, 1:14 PM IST

भंडारा - जिल्ह्यात अजूनही एकही रुग्ण नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र लवकरच भंडारा जिल्हा सुद्धा ऑरेंज किंवा रेड झोन मध्ये येण्यास तयार आहे. हे म्हणायची वेळ आली कारण जिल्हा बंदी असूनही रेड झोन ( नागपूर) मधील लोक सहज भंडारा जिल्ह्यात येत असल्याचे पुढे येत आहे. बुधवारी तर नागपुरातील सर्वात हॉट स्पॉट असलेल्या मोमीनपुरा येथून पती-पत्नी आणि त्यांचा एक मुलगा दुचाकीने भंडारात दाखल झाले. जिल्हा बंदी असूनही नागपूरहून हे दाम्पत्य भंडारा जिल्ह्यत आलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपुरातील हॉटस्पॉट भागातील दाम्पत्य भंडारा जिल्ह्यात दाखल
जिल्हा बंदी असतांना ही नागपूर वरून उप-डाऊन करणारे बरेच कर्मचारी आणि अधिकारी रोज जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्याकडून कधीतरी भंडारा हा कोरोनाग्रस्त होईल, अशी भीती वाटत असताना, बुधवारी नागपूरच्या सर्वात हॉट-स्पॉट असलेल्या मोमीनपुरा परिसरातून पती-गर्भवती पत्नी आणि एक मुलगा हे बाईकने भंडारा येथे पोहचले.

सायंकाळी गावकऱ्यांना या विषयी माहिती मिळताच त्यांनी हे कुटुंब ज्या घरी आले ते घर गाठले व त्यांना रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यासाठी तयार केले. भंडारा जिल्ह्यातील प्रशासन कोरोना बाबत किती गंभीर आहे याची प्रचिती गावकऱ्यांना तेव्हा आली जेव्हा
गावकऱ्यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास आर. आर. टी. ( Rapid response team ) च्या प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्याकडे उपलब्ध प्रत्येक अधिकाऱ्यांच्या नंबरवरती फोन करून सांगितले. मात्र रात्रीचे 2 वाजेपर्यंत कोणीही त्या गावात पोहचले नाही. दुसऱ्या दिवशी आरोग्य यंत्रणा पोहचली आणि त्या तिघांना जिल्हा रुग्णालयात घेऊन गेली आणि त्या घरातील इतर लोकांना होम क्वारंटाईन केले.

या घटनेवरून भंडारा जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा कोरोना बाबतीत किती गंभीर आहे हे दिसत आहे.
सध्या संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन सुरू असून २० तारखे नंतर ग्रीन झोन मधील जिल्ह्यात संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहे.पण संचार बंदी आणि जिल्हा बंदी असताना नागपूर वरून एक कुटुंब जिल्ह्यात दाखल होते आणि त्याची कोणीही गंभीर्याने दखल घेत नाही. मग जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल झाल्यास काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा.

भंडारा जिल्हा ग्रीन झोन मध्ये म्हणून प्रशासनाने असे गाफील राहू नये अन्यथा जिल्हा ऑरेंज किंवा रेड झोन मध्ये जाण्यास विलंब लागणार नाही. भंडारा जिल्ह्याला लाभलेले नवीन पालकमंत्री सुनील केदार यांनी या गंभीर विषयाकडे द्यावे.अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.