भंडारा - कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता भंडारा जिल्ह्यत आरटीपीसीआर चाचण्याची लॅब सुरू केली गेली असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सध्या भंडाऱ्यामध्ये ही लॅब नसल्याने या ठिकाणी कोरोना चाचणी केल्यावर चार दिवसांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त होतो. त्यामुळे रुग्णांवर उपचार सुरू करण्यात उशीर होत आहे. त्यामुळे ही TRUENAT लॅब आजच सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातच सुरू होणार आरटीपीसीआर चाचणी, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - भंडारा मंत्री राजेश टोपे बातमी
जिल्ह्यात स्वतःची लॅब नसल्याने जो त्रास नागरिकांना होत आहे. याविषयीआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खंत व्यक्त केली. तात्पुरत्या स्वरूपात आज TRUENAT लॅबचे लोकार्पण आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले असून दर दिवशी ५० लोकांचे आरटीपीसीआर टेस्ट या लॅबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यातच सुरू होणार आरटीपीसीआर चाचणी