ETV Bharat / state

भंडारा येथील ब्राम्ही गावात अपंग व्यक्तीची अज्ञात व्यक्तीकडून हत्या... - bhandara latest news

ब्राम्ही गावातील गौतम हरी मेश्राम हे एका पायाने अपंग असल्याने घरीच राहत होते. पत्नी रोजंदारीचे काम करत घर सांभाळते. तर मुलाला दारूचे व्यसन आहे. सोमवारी गौतम घरी एकटेच होते. दरम्यान, 4 वाजताच्या सुमारास त्यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केली.

handicap-person-murder
handicap-person-murder
author img

By

Published : May 12, 2020, 12:24 PM IST

Updated : May 12, 2020, 7:40 PM IST

भंडारा- पवनी तालुक्याच्या ब्राम्ही गावातील एका अपंग व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे. अपंग व्यक्तीच्या डोक्यावर मारहाण करुन ही हत्या केली आहे. गौतम हरी मेश्राम (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा- चिंताजनक : रायगडच्या उरण तालुक्यात आतापर्यंत 56 कोरोनाबाधित; आज 27 नवीन रुग्ण आढळले

ब्राम्ही गावातील गौतम हरी मेश्राम हे एका पायाने अपंग असल्याने घरीच राहत होते. पत्नी रोजंदारीचे काम करीत घर सांभाळते. तर, मुलाला दारूचे व्यसन आहे. सोमवारी गौतम घरी एकटेच होते. दरम्यान, 4 वाजताच्या सुमारास त्यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पवनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलासे घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, घटनास्थळी पोलिसांना कोणतेही हत्यार आढळले नाही. अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, गौतम यांच्या मुलाने ही हत्या केली असल्याची गावात चर्चा आहे. दरम्यान गौतम आणि त्यांच्या मुलाचे नेहमी भांडण होत असल्याचेही गावकरी सांगतात. याप्रकरणाी पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनेनंतर गौतम यांचा मुलगा घरापासून 100 मीटर अंतरावर दारूच्या नशेत बेशुद्ध अवस्थेत आढळला आहे.

Last Updated : May 12, 2020, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.