ETV Bharat / state

भंडाऱ्यात ईदसाठी बकरे चोरणारी टोळी सिनेस्टाइलने टोल नाक्यावरील बॅरिकेट तोडून फरार - बोकड

बोकड चोरून पळत असताना कारधा टोल नाक्यावरील बॅरिकेट्स तोडून चोरटे पळाले असून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोलनाका कर्मचारी यात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कारधा येथील टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे.

भंडारा
author img

By

Published : Jul 29, 2019, 8:41 PM IST

भंडारा - येत्या ईदनिमित्त बोकड चोरणाऱ्या टोळीने भंडाऱ्यात धुमाकूळ घातला आहे. बोकड चोरून पळत असताना कारधा टोल नाक्यावरील बॅरिकेट्स तोडून चोरटे पळाले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोलनाका कर्मचारी यात गंभीर जखमी झाला आहे. ही घटना कारधा येथील टोल नाक्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ईदसाठी बकरे चोरणारी नागपूरची टोळी सक्रिय; टोळीचा पाठलाग करताना टोल नाक्यावरील बॅरिकेट तोडून पळाले

बकरी ईदच्या दिवशी बोकडांची चांगली किंमत मिळते. त्यामुळे नागपूर येथील चोरट्यांच्या गँगने भंडारा जिल्ह्यातील बोकड चोरून नेण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी या चोरट्यांनी लाखनी तालुक्यातील गडेगाव येथून राष्ट्रीय महामार्ग परिसरात चरत असलेल्या एका बोकडाला चोरून नागपूरच्या दिशेने नेत होते. पोलिसांना याची सूचना मिळताच भंडारा रोडवरील कारधा टोल नाक्यावर संबंधित गाडी अडवण्याची सूचना केली. सूचनेप्रमाणे गाडी टोल नाक्यावर येताच टोल कर्मचाऱ्यांना तिला अडवण्यासाठी बॅरिकेट्स लावले मात्र, चोरट्यांनी ते बॅरिकेट्स उडवून गाडी वेगाने पुढे काढली. पुन्हा एक बॅरिकेट्स आडवा केला असता त्यालाही तोडून आरोपी गाडी घेऊन सुसाट पळून जाऊ लागले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याची माहिती कारधा पोलिसांना मिळताच त्यांनी या गाडीचा पाठलाग केला. दवडीपार गावाजवळ या आरोपींनी गाडी रस्त्यावर सोडून पळ काढला. या गाडीत एक बोकड आढळून आला असून ही गाडी नागपूर येथील व्यक्तीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गाडी थांबवण्यासाठी गेलेला टोल नाक्यावरील कर्मचारी यात जखमी झाला आहे. संपूर्ण घटनेची नोंद लाखनी आणि कारधा पोलीस स्टेशनमध्ये असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. आरोपी फरार असून पोलिसांद्वारे शोध सुरू आहे. आरोपी मिळाल्यास आतापर्यंत चोरीला गेलेले बोकड सापडतील आणि भविष्यात या बोकड चोरीच्या प्रकारावर अंकुश लावता येईल.

Intro:Body:ANC: - येत्या ईद निमित्त बोकड चोरणाऱ्या टोळीने भंडारात धुमाकुळ घातला असुन बोकड चोरून पळत असतांना कारधा टोल नाक्यावरील बॅरिकेट्स तोडून चोरटे पळाले असुन त्यांना अडविणाऱ्या प्रयत्न करणाऱ्या टोलनाका कर्मचारी यात गंभीर जखमी झाला आहे, ही थरार उडवीनारी घटना कारधा येथील टोल नाक्याच्या सीसीटीवी कॅमेरात कैद झाली आहे.

बकरी ईद च्या दिवशी बोकडांची चांगली किंमत मिळते त्यामुळे नागपूर येथील चोरट्यांच्या गॅंग ने भंडारा जिल्ह्यातील बोकड चोरून नेण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी या चोरट्यांनी लाखनी तालुक्यातील गड़ेगाव येथून राष्ट्रीय महामार्ग परिसरात चरत असलेल्या एका बोगड ला चोरून नागपूर च्या दिशेने नेत असतांना याची माहिती लाखनी पोलिसांना मिळाली, पोलिसांना याची सूचना मिळताच भंडारा रोड वरील कारधा टोल नाक्यावर संबंधित गाड़ी अडविन्याची सूचना केली. सूचनेप्रमाणे गाडी टोल नाक्यावर येताच टोल कर्मचाऱ्यांना तिला अड़विन्यासाठी बेरीकेट्स लावले मात्र चोरट्यानी ते बॅरिकेट्स उडवून गाडी वेगाने पुढे काढली पुन्हा एक बॅरिकेट्स आडवा केला असता त्याला ही तोडून आरोपी गाड़ी घेऊन सुसाट पळून जाउ लागले ही संपूर्ण चित्तारंजक घटना सीसीटीवी कैद झाली आहे.
याची माहिती काराधा पोलिसांना मिळताच त्यांनी या गाडीचा पाठलाग केला दवडीपार गावाजवळ या आरोपोनी गाडी रस्त्यावर सोडून पळ काढला.
या गाडीत एक बोकड आढळून आला असून ही गाडी नागपूर येथील व्यतीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे,
गाडी थांवबविणारा टोल नाक्यावर कर्मचारी जखमी झाला असून संपूर्ण घटनेची नोंद लाखनी आणि कारधा पोलिस स्टेशन मध्ये असुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला गेला आहे. आरोपी फरार असुन पोलिसांद्वारे शोध सुरु आहे हे आरोपी मिळाल्यास आता पर्यंत चोरीला गेलेले बोकड सापडतील आणि भविष्यात या बोकड चोरीच्या प्रकारावर अंकुश लावता येईल.

1)गजानन कंकाळे बाइट (पो नि कारधा)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.