ETV Bharat / state

वडिलांच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून मुलीने दुसऱ्या दिवशी दिला पेपर, बनायचे आहे आयएएस - भंडारा

शिक्षकांनी दिलेल्या धाडसामुळे प्रणालीने वडिलांच्या पार्थिवजवळ बसून रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी दुःखाचा डोंगर बाजूला सारून  पेपर व्यवस्थित सोडवून तिने त्यानंतर आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

प्रणाली मेश्राम आणि तिचे वडील खेमराज मेश्राम
author img

By

Published : Mar 6, 2019, 10:52 PM IST

भंडारा - वडिलांच्या पार्थिवाजवळ रात्रभर बसून मुलीने दुसऱ्या दिवशी परीक्षा दिल्याची हृदयस्पर्शी घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे. परीक्षेनंतर मुलीने वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिला. वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पेपर दिला असून त्यांच्या इच्छेनुसार आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे संकल्प प्रणाली मेश्राम या लेकीने केला आहे.

प्रणाली मेश्राम

प्रणालीची दहावीची परीक्षा सुरू होती. मात्र, दुर्दैवाने परीक्षेच्या काळातच वडिलांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. वडिलांच्या निधनामुळे प्रणाली पूर्णपणे हादरून गेली. दुसऱ्या दिवशी तिचा इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे ती भांबावून गेली. अशातच तिचे मुख्याध्यापक एसके खोब्रागडे, पर्यवेक्षक मुळे आणि सहशिक्षक संजय प्रधान यांनी प्रणालीच्या घरी जाऊन तिची परीक्षेसाठी मानसिक तयारी केली आणि तिच्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी तिला इंग्रजीच्या पेपरची तयारी करण्यास सांगितले.

शिक्षकांनी दिलेल्या धाडसामुळे प्रणालीने वडिलांच्या पार्थिवजवळ बसून रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी दुःखाचा डोंगर बाजूला सारून पेपर व्यवस्थित सोडवून तिने त्यानंतर आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तिच्या धाडसाचा आणि तिने घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दुःख बाजूला ठेऊन तिने इंग्रजीचा पेपर व्यवस्थित सोडविला वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी खूप शिकेल उच्चशिक्षित होऊन आयएएस किंवा आयपीएस होईल असा संकल्प प्रणालीने केला आहे.

प्रणालीचे वडील खेमराज मेश्राम हे राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक पदावर काम करीत होते. पत्नी आणि दोन मुलांसह त्यांचा संसाराचा गाडा जेमतेम चालत होता. एसटी महामंडळामध्ये असल्यामुळे पैशाची नेहमीच चणचण भासायची. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकून मोठ्या पदावर जावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते प्रणालीला नेहमीच प्रोत्साहन देत असत. मात्र, अचानक त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. मुलीचे दहावीचं वर्ष, कर्करोगाच्या उपचारावर होत असलेला खर्च एवढ्या सगळ्या दुःखातही खेमराज मात्र मुलीला अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन द्यायचे.

undefined

Intro:व्हिडिओ whatapp वर पाठविले आहेत. कारण वेब मोजो ने जात नोव्हतें
Anc : वडिलांच्या पार्थिवाचं जवळ रात्रभर बसून दुसऱ्या दिवशी परीक्षा दिल्यानंतर वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिल्याची हृदयस्पर्शी घटना लाखांदूर तालुक्यात घडली आहे वडिलांच्या स्वप्न पूर्तीसाठी पेपर दिला असून त्यांच्या इच्छेनुसार आयएएस किंवा आयपीएस बनण्याचे संकल्प प्रणाली प्रणाली मेश्राम या लेकीने केला आहे.

Body:वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या पार्थिवाचे शेजारी बसून अभ्यास करण्याचा धाडसी निर्णय घेणारी ही मुलगी लाखांदूर तालुक्यातील खैरी या छोट्याशा गावातील आहे.
वडील जिवंत असतांना अभ्यास कर शिक्षण घेत पुढे जा आणि स्वतःच्या पायावर उभी रहा हा कानमंत्र तिला तिच्या वडिलांनी नेहमीच तिला आणि तिनेही कधी वडिलांना निराश होऊ दिले नाही ती दहावी पर्यंत पोहोचली मुलीची शैक्षणिक प्रगती पाहून वडीलही आनंदी होते मुलीची दहावीची परीक्षा सुरू होती मात्र दुर्दैवाने परीक्षेच्या काळातच शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारे वडील अचानक कर्करोगाने मरण पावले, वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणाली पूर्णपणे हादरून गेली, तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले होते, दुसऱ्या दिवशी प्रणाली चा इंग्रजी चा पेपर होता त्यामुळे काय करावं काय करू नये या विचाराने ती भांबावून गेली अशातच तिच्या मदतीला धाऊन आलेत तिचे मुख्याध्यापक एस के खोब्रागडे पर्यवेक्षक मुळे आणि सहशिक्षक संजय प्रधान यांनी प्रणालीच्या घरी जाऊन तिची पुन्हा मानसिक तयारी केली आणि तिच्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी तिला उद्याच्या इंग्रजीचा पेपर साठी तयारी करण्यास सांगितले शिक्षकांनी दिलेल्या धाडसामुळे प्रणाली रात्रभर इंग्रजी विषयाचा अभ्यास वडिलांच्या पार्थिव शरीराबाहेर बाजूला बसून केला आणि दुसऱ्या दिवशी दुःखाचा डोंगर बाजूला सारून इंग्रजीचा पेपर व्यवस्थित सोडून त्यानंतर आपल्या वडिलांच्या शरीराला अंत्यसंस्कार केले. तिच्या धाडसाचा आणि तिने घेतलेल्या निर्णयाचा संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत असून या लेखी चा जिल्ह्यातील लोकांना अभिमानी वाटतो आहे.
प्रणालीचे वडील खेमराज मेश्राम हे राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक पदावर काम करीत होते पत्नी आणि दोन मुलांसह त्यांचा संसाराचा गाडा जेमतेम चालत होता एस टी महामंडळ मध्ये असल्यामुळे पैशाची नेहमीच चणचण भासायची त्यामुळे आपल्या मुलांनी मोठे व्हावं खूप शिकावं आणि मोठ्या पदावर जावं अशी त्यांची नेहमीची इच्छा यायची आणि त्यामुळे प्रणालीला ते नेहमीच प्रोत्साहन देत असत मात्र अचानक त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि त्यांच्या कुटुंबावर जणू वीज कोसळली मुलीचे दहावीचं वर्ष स्वतः झालेला कर्करोग त्याच्यासाठी होत असलेल्या औषधी उपचार एवढ्या सगळ्या दुःखातही हेमराज मी मात्र मुलीला सतत अभ्यासासाठी क्रेडिट केल्या 4 मार्चला खेमराज यांचा मृत्यू झाला लाडक्या वडिलांचा मृत्यूचा दुःख उद्या ठेवून तिने इंग्रजीचा पेपर व्यवस्थित सोडविला वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी खूप शिकेल उच्चशिक्षित होऊन आयएएस किंवा आयपीएस होईल असा संकल्प प्रणाली ने केला आहे.
बाईट : प्रणाली मेश्राम
एस के खोब्रागडे, मुख्याध्यापक

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.