ETV Bharat / state

भंडाऱ्यावरुन पवनीला जात असलेल्या पायी दिंडीतील भाविकांना भरधाव वाहनाची धडक - Lateste News

कार्तिकी एकादशीनिमित्त भंडाऱ्यावरुन पवनीकडे निघालेल्या तीन दिवसीय पायी दिंडीतील भाविकांना एका कारने धडक दिल्याने 11 भाविक जखमी झाले आहेत. 11 भविकापैकी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पवनी तालुक्यातील अड्याळ ते नवेगाव फाट्या दरम्यान रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

Bhandara to Pawani Devotees passing by hit by heavy vehicles
दिंडीतील भाविकांना भरधाव वाहनाची धडक
author img

By

Published : Nov 16, 2021, 6:45 AM IST

भंडारा - कार्तिकी एकादशीनिमित्त भंडाऱ्यावरुन पवनीकडे निघालेल्या तीन दिवसीय पायी दिंडीतील भाविकांना एका कारने धडक दिल्याने 11 भाविक जखमी झाले आहेत. 11 भविकापैकी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पवनी तालुक्यातील अड्याळ ते नवेगाव फाट्या दरम्यान रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना अड्याळ व भंडारा (Bhandara) येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Bhandara to Pawani Devotees passing by hit by heavy vehicles
दिंडीतील भाविकांना भरधाव वाहनाची धडक
6 जण गंभीर जखमी या अपघातामध्ये लक्ष्मण किसनराव वानखेडे (६८), वसंत बाबुराव कुर्वे (४५), प्रसन्न महाजन (६८) तिघेही भंडारा यथील निवासी आहेत. सारिका नंदकिशोर वानखेडे (४५) रा.शहापूर, नितीन लक्ष्मीकांत व्यवहारे (५५) रा.नागपूर आणि वाहनचालक दिनेश जागो वाघाडे (२८) रा.वाकेश्वर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित पाच जणांना किरकोळ जखमा झाल्याने प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.शनिवारी होती दिंडी यात्रा कार्तिकी एकादशी निमित्त विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या पवनी येथे जाण्यासाठी शनिवारी भंडारा येथून 22 भाविक निघाले. रविवारी आड्याळ येथे ही दिंडी पोहोचल्यानंतर दुपारी भोजन करून दोनच्या सुमारास पुन्हा मार्गस्थ झाली. या दिंडीत 22 भाविक सहभागी होते. दोन-दोनच्या रांगेत ते पायी देवाचे भजन आणि नामस्मरण करत पुढे जात होते. अचानक मागून येणारी कार घुसली दिंडी यात्रेतदिंडी अड्याळ वरून निघाल्यानंतर सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव फाट्याजवळ पोहोचली. नेमक्या त्याच वेळेस मागून येणारी एक कार ही भरधाव वेगाने रस्त्याच्या कडेवरून चालणाऱ्या दिंडीत घुसली, देवाचे नामस्मरण करून पुढे जाणाऱ्या भाविकांमध्ये अचानक गोंधळ उडाला. काही समजण्याच्या पहिलेच या दिंडीतील 11 जण जखमी झाले आणि सर्वत्र धावपळ सुरु झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.